पत्रकारांत मिठाई आणि पाकीटावरून भांडण

बुलडाणा जिल्हातील नांदूरा तालुक्यातील काही पत्रकारांना पोलीसांच्या वतीने मिठाईचे वाटप व सोबत १५०० रु. पाकीट देऊन आपल्या कडे लक्ष असू देण्याबाबत बुलडाणा दै.देशोन्नतीमध्ये बातमी छापण्यात आली होती. यानंतर दिवसभर नांदु-याची मिठाई काही पत्रकारांच्या गळ्याखाली उतरत नसतांनाचे पाहुन थेट दै.देशोन्नतीला आव्हान देणारे व मिठाई घेणा-या पत्रकारांचे नांवे छापा नाही तर माफी मागा असा सल्ला देशोन्नतीच्या आवृत्ती संपादकाला दै.विदर्भ मतदारने  दिला आहे. दिवाळीची मिठाई मिळाली नाही म्हणुन त्यांनी बातमी छापली असल्याचा उल्लेख करण्यात आला असुन मिठाई घेणा-यांची यादी न छापता व नांदुरा पत्रकारांची जाहिर माफि न मागितल्यास दै.देशोन्नती प्रकाशक,मालक, आवृत्ती संपादक यांच्यावर मानहानी खटला दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दै.विदर्भ मतदारमध्ये बातमी येताच सर्वत्र चर्चांना उत आला आहे. यावर दै. देशोन्नती जिल्हा सुप्रिमो काय करता यावर संपुर्ण जिल्हयातील पत्रकार लक्ष ठेवुन आहेत.मात्र, दिवाळी मिठाई नांदुरा पोलीसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. आणि पुर्वी शमलेले दै.देशोन्नती विरूद्ध दै.विदर्भ मतदार शितयुध्द पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

http://deshonnati.digitaledition.in/181289/Buldhana/6th-Nov-Buldhana#page/16/1