नागपूरच्या पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का ?

ज्यावेळी या देशात इंग्रजाचे राज्य होते,तेव्हा इंग्रजांनी या देशातील गरीब जनतेवर अत्याचार सुरू केला होता,तेव्हा लोकमान्य टिळक यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला होता,इंग्रजाचे डोके ठिकाणावर आहे का ? या अग्रलेखाची आठवण पुन्हा एकदा आम्हाला झाली आहे.
निमित्त आहे नागपूरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांची दुर्देवी कहाणी....मित्रानो,नागपूर टाइम्स मध्ये अनेक वर्षे प्रुफ रिडर आणि पत्रकार म्हणून काम केलेले रविंद्र दासगुप्ता यांची वृध्दापकाळात आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे ते रस्त्यावर कचरा गोळा करून पोट भरत होते.ते अनेकजण उघड्या डोळयांनी पहात होते.राजकीय नेत्यांच्या पंगतीत सदैव बसणा-या,त्यांच्या खुशमस्करीच्या बातम्या छापून चारचाकीत फिरणा-या पत्रकारांना दासगुप्तांची दुर्देवी कहाणी कधी लिहावी वाटली नाही किंवा त्यांना मदत करावी वाटली नाही.नागपुरात अनेक पत्रकार संघटना आहेत,पत्रकार कल्याण ट्रस्ट आहे,त्यांना कधी दासगुप्तांना मदत करावी वाटली नाही.
दासगुप्तांनी दुर्देवी कहाणी,नागपूरमधल्या आमच्या एका मित्रांना दिसली,त्यांनी छायाचित्रासह ही दुर्देवी कहाणी आमच्यापर्यंत पोहचविली,आम्ही लगेच प्रकाशित केली.ही कहाणी वाचून अवघा महाराष्ट्र हळवळला.अनेकांचे डोळे चिंब झाले,आम्हाला तर चैन पडत नव्हती.ऐन दिपावलीत ही बातमी प्रकाशित झाल्यामुळे दासगुप्तांना मदत करणे,हीच आमची खरी दीपावली राहील,म्हणून आम्ही संकल्प सोडला.आम्ही तातडीने नागपूरचे पत्रकार सुरेश चरदे यांना सांगून दासगुप्तांच्या घरी मिठाई पाठविली आणि त्यांची दीपावली गोड केली.
बेरक्यानंतर आमचे लक्ष नागपूरच्या मीडियाकडे होते.लोकमतनेही हे प्रकरण उचलले.शफी पठाण या तरूण पत्रकाराने दासगुप्तांची स्टोरी प्रकाशित केली.या स्टोरीनंतर तरी नागपूरच्या पत्रकार संघटना दासगुप्तांच्या मदतीला उतरतील,अशी अपेक्षा होती,मात्र घडले उलटेच.
या संघटनांचे पदाधिकारी सांगू लागले,दासगुप्ता हे श्रीमंत आहेत,त्यांना मदतीची काय गरज आहे,ऐवढयावर हे पदाधिकारी थांबले नाहीत,तर दासगुप्ता हे वेडे आहेत,असा जावाईशोध लावला.यासंदर्भात त्यांनी अनेक पत्रकारांना ई-मेलसुध्दा पाठविला.आम्हाला सुध्दा खुलासा प्रसिध्द करा,अन्यथा कोर्टात केस करू,अशी धमकी दिली.अशा पुचाट धमक्यांना बेरक्या कधी घाबरत नाही,किंवा घाबरणारही नाही,हे कदाचित त्यांना माहित नसावे.
नागपूरच्या पदाधिका-यांच्या वळवळीमुळे आमच्यावरच नाही तर लोकमतच्या बातमीवर आणि विश्वासर्हतेवर  प्रश्नचिन्ह निर्माण झाला.लोकमतने काल बुधवार दि.६ नोव्हेंबर रोजी दासगुप्ता यांना लोकमत कार्यालयात आमंत्रित केले.दासगुप्ता आले आणि चक्क दोन तास भरभरून बोलले.त्यांनी सगळ्यांच्या प्रश्नांना अस्सल इंग्रजीत उत्तरे दिली.त्याची सविस्तर बातमी आज दि.७ नोव्हेबर रोजी नागपूर लोकमतमध्ये प्रसिध्द झाली आहे.ती बेरक्यावर साभार घेण्यात आली आहे.
ज्ञानाचे भांडार असलेला हा वयोवृध्द पत्रकार वेडा नाही,त्यांची मानसिक स्थिती अगदी उत्तम आणि ठणठणीत आहे.मग ते वेडा कसे ? त्यांना वेडा कोणी ठरविले,कुठल्या आधारे ठरविले ? एखादा व्यक्ती वेडा नसताना,वेडा म्हणणे,तेही लिखित स्वरूपात हा कायदेशीर गुन्हा होवू शकतो.आता नागपूरच्या पत्रकार संघाच्या पदाधिका-यांवर दासगुप्ता यांना वेडा ठरविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी का,याबाबत आमच्या वकिलांशी चर्चा सुरू आहे.याबाबत आम्ही काय करावे,याचा निर्णय आपण द्यायचा आहे.
मित्रानो,दुर्देवाने म्हणावे वाटत आहे,नागपूरच्या पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असले असते तर दासगुप्तांना ते वेडे ठरविले नसते.आम्ही दासगुप्तांना मदत करा म्हणून त्यांच्या दारात गेलो नव्हतो.अवघा महाराष्ट्र दासगुप्तांना मदत करण्यासाठी सरसावला असताना,त्यात बिबे घालण्याचे काम या लोकांनी केले आहे.यांना संघटनेच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.त्यांनी आता सरळ राजीनामा द्यावा आणि दासगुप्ता यांची माफी मागावी अन्यथा बेरक्या त्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही.
नागपूर पत्रकार कल्याण ट्रस्टचे महाशयाना एका पेपरने हाकलून लावले आहे.त्यांच्याकडे कोणताही पेपर नाही.पत्रकार कल्याण निधीच्या नावाखाली त्यांनी लाखो रूपयाच्या देणग्या उकळल्या आहेत.त्यांच्याकडे म्हणे करोडो रूपयाची मालमत्ता आहे.कोठून आली ही मालमत्ता,त्यांची आयकर कार्यालयाने चौकशी करावी,अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करीत आहोत.या महाशयांना म्हणे चामडीचा खूप नाद आहे.त्यांचे सगळे काळे धंदे आता बेरक्या उघड करणार आहे.तुर्तास ही स्मॉल ट्रीटमेंट आहे.
बाबानो,मदत करायची नसेल तर नका करू,पण एखाद्याला वेडा ठरवून,स्वत: वेडा असल्याची पावती देवू नका,बस्स,सध्या तरी ऐवढेच,पुन्हा भेटू.
बेरक्या उर्फ नारद

नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा लवकरच भांडाफोड
नागपुरात श्रमिक पत्रकार संघाची बिल्डींग आहे.या बिल्डींगमध्ये 15 वर्षापासून अधिक काळ झाडू मारण्यापासून अनेक कामे करणारा तसेच कागदपत्रे आणि व्यवहार पाहणाऱ्या राजेंद्र महाडीक या कर्मचाऱ्यांस सध्याचे पदाधिकारी अत्यंत अपमास्पद वागणूक देत होते.शेवटी त्यास लाथा-बुक्या मारून काढून टाकले.
या निर्दयी पदाधिकाऱ्यांची अशी अनेक लफडी आहेत.दासगुप्तांना वेडा ठरविणारे हे पदाधिकारी किती वेडे आणि निच प्रवृत्तीचे आहेत,याचा भांडाफोड लवकरच...