बेळगाव तरुण भारतची मुंबई आवृत्ती डिसेंबर मध्ये !

मुंबई - ९५  वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकारितेतील सर्वात जुने वर्तमान पत्र असलेल्या बेळगाव तरुण भारतची मुंबई आवृत्ती डिसेंबर मध्ये सुरु होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  खरेतर तरुण भारत च्या मुंबई आवृत्तीचे लॉन्चिंग दिवाळीच्या मुहूर्तावर होणार होते. मात्र तरूण भारतच्या प्रशासकीय कारभार फारच किचकट आहे. सर्व निर्णय बेळगावातून होत असल्याने मुंबई आवृत्तीला उशीर झाला आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. 
 मुंबईतील गणेशोस्तव काळात तरुण भारत ने मुंबई आवृत्तीचे जोरदार मार्केटिंग केले होते. त्या दरम्यान फारतर दसरा किंवा  दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई आवृत्तीचे लोन्चींग होणे अपेक्षित होते, तसे काही झाले नाही.  बेळगावात संपादकीय आणि डीटीपीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जेवढे वेतन तिथे दिले जाते त्याची तुलना करून मुंबई कार्यालात नवीन माणसे भरण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. मुलाखतीही झाल्यात  मात्र मुंबईत कमी पगारात काम करणारे पत्रकार, संपादकीय मंडळी,  डीटीपी सेक्शनसाठी माणसे भेटणे अशक्य आहे. त्यातही मुंबई कार्यालयात राजकारण आहेच पण राजकारण जेव्हा होते कि तिथे मुबलक  कर्मचारी हवेत इथे तर पाच - आठ कर्मचार्यामध्ये राजकारण धुमसतंय.  दोघा तिघात ' जेष्ठ- कनिष्ट ' असा वाद धगधगत असल्याने यामुळे अनेक अडचणी देखील उद्भवत आहेत. तर कार्यालयात मुंबई आवृत्तीचे कामाचे स्वरूप / अंकाची रचना या बाबत असे काही चित्र निर्माण केले आहे कि त्यामुळे सारेच हादरलेत. आधीच एक तर कर्मचाऱ्यांचा तुटवडा , त्यात तुटपुंजे पगार त्यामुळे काही का असेना थोडा फार नाराजीचा सूर तेथे आहेच. 
लढवय्या, जिगरबाज  म्हणून ख्याती असलेले संपादक किरण ठाकूर मोठ्या जिकरीने तरुण भारतवर जीव ओतत आहेत. त्या बद्दल वादच नाही!  सीमावासीय मराठी भाषकांसाठी लढणारं वृत्तपत्र म्हणून बेळगाव तरुण भारतची ओळख आहे. बेळगाव सीमाप्रश्नी मराठी बांधवांच्या बाजूने लढणाऱ्या किरण ठाकूर यांनि कर्नाटक सरकारला  नाकी नऊ आणले होते. जुलै २ ० १ २  कर्नाटक सरकारच्या मध्ये आमदारांची बदनाम केल्याचा ठपका ठेवून विधिमंडळानं या वृत्तपत्रावर कारवाईची मागणी केली होती. कर्नाटक विधिमंडळात या मुद्यावर याची  अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर या वृत्तपत्राचा छपाई परवाना रद्द करून संपादक किरण ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावर चळवळीत अग्रेसर असलेल्या ठाकूर यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. त्यात त्यांचा विजय देखील झाला. त्यांच्या कर्तृत्त्वाला आम्ही देखील सलाम करतो!  पण आता मुंबईत आवृत्ती येत असल्याने त्याचा डोलारा सांभाळणे जरा अवघडच आहे.  तशी मुंबई कार्यालात तरुण भारतला ' यंग ब्रिगेड ' चांगली लाभली आहे. गेल्या एक दोन महिन्यांपासून डमी आवृत्तीसाठी सगळेच झुंजतायत. पण काही नव्या असंतुष्ट आत्म्यांमुळे त्याचा त्रास सगळ्यांना उद्भवू शकतो. त्यामुले  ठाकूरयांनी तेथील कार्यालयीन बाबीवर विशेष लक्ष ठेवले तर जेणेकरून यातून काहीतरी अजून चांगले तथ्य निघेल. असो बेळगाव तरुण भारतच्या मुंबई आवृत्तीसाठी आमच्या शुभेच्छा !