"भास्कर" समूहाताही "तहलका"!; वरिष्ठ अधिकारयावर लैंगिक शोषणाचे आरोप


भास्कर समूहातही "तहलका" उघडकीस आला आहे. भास्कर समूहाचा रेडियो 'माय एफएम'चे सीईओ हरीश भाटिया याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर हे संपूर्ण प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.  एका महिला कर्मचारयाशी पदाचा गैरवापर करून तिचा शारीरिक छळ केल्याने भाटिया अडचणीत आला आहे. तरीही नैतिकतेचा आणि उच्च आदर्शांचा डांगोरा पिटणारया "भास्कर"ने त्याची हकालपट्टी न करता त्याची पाठराखण केली आहे. अन्य दोन महिला कर्मचारयांनीही "भास्कर"मधील वरिष्ठांकडून होत असलेल्या शोषणाच्या आरोपांचे समर्थन केले आहे. भाटियाला अटक करण्यात आली असून तो आता जामिनावर मोकाट आहे.

ही संपूर्ण बातमी इथे वाचा …


"हिंदू" दैनिकाने उभा केला आदर्श
 

एकीकडे "भास्कर"मध्ये दांभिकपणा सुरू असताना "हिंदू"ने मात्र लैंगिक शोषणाबाबतीत नीती घोषित केली आहे. लैंगिक शोषणाच्या विरोधात प्रत्येक आस्थापनेत अंतर्गत समिती असणे कायद्याने बंधनकारक असूनही दुसरयांना फ़ुकटचे सल्ले देणारया  एकाही माध्यमसंस्थेत तशी व्यवस्था नाही. त्यामुळे "हिंदू"चे पाउल स्वागर्ताह मानले जात आहे.  कस्तूरी एण्ड संस लिमिटेड ने 28 नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे. लैंगिक शोक्षणविरोधी नीती "हिंदू"मध्ये 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे. त्यानुसार "हिंदू"ची सर्व कार्यालये अथवा कामासाठी बाहेर असतानाही शारीरिक संबंध स्थापण्याची मागणी, छेड-छाड, टोमणे, महिला सहकारयांसमोर अश्लील टिप्पणी, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, अश्लील हावभाव, अश्लील साहित्य जसे फ़ोटो, वेबसाइटस दाखविणे; तसेच शोषण अथवा हिंसेच्या व्याखेत बसेल अशी कोणतीही केलेली कृती अपराध ठरणार आहे.

कस्तूरी एण्ड संस लिमिटेडची नोटीस इथे वाचा

ता. क. :
महाराष्ट्रातील पत्रकारितेतही लिंगपिसाटांचा धुमाकूळ आहे. नुकतेच एका "रंगीला"विरुद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाशीनजीकच्या पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे. एका उच्चशिक्षित; डॉक्टरेट महिला कर्मचारयाने ही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. "रंगीला" या महिलेवर राजीनाम्यासठीही दबाव आणीत आहे. "रंगीला"च्या रासलीला व "प्रताप" नव्या संस्थेतही सुरू झाल्याची चर्चा आहे. जिथे जाता; तिथे लफडी! "रंगीला"रावांच्या छळाच्या दडपणात पिचलेल्या एकाच्या अपघात झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. दुसरे दोघे राजीनामा देउन बाहेर पडले आहेत. एक तर बिचारा नुकताच मुंबईच्या पश्चिमेकडून नवी मुंबईत आलेला गडी "चौफेर" हैराण झाला आहे. तो पुन्हा जुन्या घरी जाण्यासाठी मालकांना विनवण्या करून आला आहे.