पत्रकार डॉ. संजय भोकरडोळे यांचे पुस्तक जळगाव विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात!




पत्रकार डॉ. संजय कृष्णाजी भोकरडोळे यांचे "आठवणी स्वातंत्र्यसैनिकांच्या" या पुस्तकाचा जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल डॉ. बोरसे यांनी यासंदर्भात परिपत्रक कास्धून ते खानदेशातील सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे.

'उमवि'च्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील इतिहास विभागाच्या डॉ. सुलोचना पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक अभिप्रायानंतर विद्यापीठाने या पुस्तकाची अभ्यासक्रमासाठी शिफारस केली आहे. एका पत्रकाराचे पुस्तक विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या पुस्तकातून खानदेशातील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

डॉ. संजय भोकरडोळे (9370673579) यांनी बीएस्सी, एमए, एमसीजे अशा शिक्षणानंतर पत्रकारितेत पीएचडी प्राप्त केली आहे. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रातून त्यांनी जळगावात दीर्घकाळ काम केले. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत 'जलस्वराज'साठी जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम केले आहे. दबाव आणून राजीनामा घेणारया 'सकाळ'च्या मालक, संचालक, संपादक, प्रशासनाला त्यांनी न्यायालयात खेचून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात नमते घ्यायलाही भाग पाडले आहे. त्यांचा हा लढा सध्याच्या पीडित पत्रकारांसाठी विस्तृतपणे मांडणार असल्याचे 'बेरक्या'ने यापूर्वीच जाहीर केले आहे.

राज्यभरातील पत्रकारांना हे पुस्तक निम्म्या किमतीत देण्याचे डॉ. भोकरडोळे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी लेखकाशीच थेट संपर्क साधावा (E-Mail : bhokardolesanjay@gmail.com. डॉ. भोकरडोळे यांनी "यशस्वी वार्ताहर कसे व्हावे?" हे पुस्तकही लिहिले असून त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.