हिवाळी अधिवेशनात दिव्यचॆ दिव्य कारनामे....

अकोल्यात आलेले दिव्य मराठी हिवाळी अधिवेशनात दणकून गाजवेल असे वाटत होते पण टीम लिडरलच राजकारण आणि एकमेकांची भांडणे अशा अपरिपक्व कामात शक्ती घालवत असल्याने हिवाळी अधिवेशनात दिव्यची काडीचीही चर्चा झाली नाही. उलट घोड चुकाच झाल्या. मराठवाड्यातील व विदर्भातील आमदारांची नावे व फोटो चुकीचे लागले. मुख्यमंत्र्यांच्या बातमीत कच-याचा फोटो लागला. खास बाब म्हणजे हे सर्व काही जण जाणीवपूर्वक करत होतॆ. दिव्यचा एका स्पर्धकाने तशी त्यांना सुपारीच दिली आहे. त्यात चांगले काम करणारे घालवायचे. आगामी लोकसभा निवडणूक दिव्यला कैश करु द्यायची नाही म्हणून दिव्य मध्येच राहून आतल्या आत व्यवस्था हळूहळू पोखरायची अशी ही सुपारी आहे. त्यासाठी त्यांना स्पर्धकाकडून आर्थिक मोबदलाही नियमितपणे मिळत आहे. ईतकॆच नव्हे तर दिव्यपेक्षा अस्तित्वात असलेला हा स्पर्धक आपल्याला घरपोच कसे वेतन, भत्त्याचे चेक आणून देतो हे सांगत अनेकांचे 'मत'परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशा या कारवाया वाढत जातील. अशात दिव्यला घरभेदींमध्ये तग धरायचा आहे. या घरभेदींसोबतच दैनिक जागरणच्या मराठी दैनिकाचे आव्हानही आहे. अलीकडेच जागरणने नाशिकमध्ये आपली ओळख लपवून संपादकीय टीमची भरती सुरू केली आहे. दिव्य मराठी मधील अनेकांना येण्यासाठी निरोपही मिळाले आहेत. 2014 मध्ये दिव्य प्रमाणेच वेगाने महाराष्ट्रभर जागरणची मराठी एडिशन सुरू होणार आहॆ. जागरणने दिव्यपेक्षा दीडपट व प्रसंगी दुप्पट पगार देण्याची तयारीही चालवली आहे. त्यामुळे दिव्यला जरा जपूनच पावले उचलावी लागणार आहेत.

दिव्यतून सहांची हकालपट्टी
अकोला दिव्य मराठी ( Sales and marketing ) मधून सहा जणांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. व्यवस्थापनाने काही घोळ पकडल्यावर ही कारवाई झाली आहॆ म्हणे. यानंतर विदर्भ एडिशनच्या सर्व कार्यालयांची तातडीने तपासणी सुरू झाली आहे. दुसरे म्हणजे आणखी एका नाट्यमय घडामोडीनंतर दिव्य अकोल्याच्या बातम्यांच्या प्लेसमेंटच्या अंतिम अधिकारातही बदल करण्यात आला आहे.