नागपूर - आपल्या सहकारी शहर बातमीदाराला सेवेतून कमी
केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तालुका बातमीदाराने गावातील काही
निवडक वृत्तपत्राच्या पत्रकारांसाठी खास पार्टी आयोजित केली होती. पार्टीत
सहभागी पत्रकारांच्या मर्जीनुसार ऑर्डर देण्यात आले. मग, एका मागून एक
मद्याचे पेग पोटात रिचविले. त्यानंतर जेवणाचा मेणू सांगण्यात आला. त्यात
खास मेणू म्हणजे मांसाहारी भाजी. भाजीयेईपर्यंत स्नॅक्स सुरुच होते आणि
विदेशी मद्यजलही. तासाभराने पार्टी जोरात रंगू लागली असताना मांसाहारी भाजी
वेटरने टेबलावर ठेवली. ताटात भाजी पडताच सर्वांनी तंदूरी पोळी अन् मटनाचा
आस्वाद सुरू केला. मात्र, ही भाजी आयोजकालाच आवडली नाही. आधीच पोटात भूक
आणि मद्याचा डोज असल्याने पारा चांगलाच भडकला. वेटरला बोलावून चांगलीच
कानउघडणी केली. वेटर सांगू लागला की, ही चूक माझी नाही. भाजी आवडली नसेल तर
स्वयंपाकीकडून परत बनवून आणतो. मात्र, बातमीदार महोदय ऐकण्याच्या
मनस्थितीत नव्हते. चल, तुझ्या मॅनेजरला
बोलवं. कोण आहे, या हॉटेलचा मालक, असे म्हणत बातमीदाराने टेबलावरच दारुचे
ग्लॉस खाली आपटणे सुरू केले. मग, काय तर पुढे तोलच गेला. सहकारी
पत्रकारांनी जाऊ द्या, म्हणत समजावित होते. मात्र, मधुबनात वसंत डोलू
लागला. हा किस्सा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील. उदय भविष्यपत्रात
हा बातमीदार गत १० वर्षांपासून कार्यरत आहे. शिवाय दीड वर्षांपूर्वी एका
शहर बातमीदाराची नियुक्ती करण्यात आली. या बातमीदाराकडे पेपरची एजन्सी आहे.
पेपरवाढ व्हावी, या उद्देशाने नवनव्या बातम्या तो कार्यालयात पाठवू लागला.
दुसरीकडे तालुका बातमीदार महाविद्यालयात प्राध्यापक असल्याने त्यांच्या
बातम्याचा ओघ नवख्या बातमीदाराच्या तुलनेत कमी पडला.
नव्या बातमीदाराच्या बातम्या आणि शहरात त्याने प्रस्थापित केलेली ओळख
तालुका बातमीदाराला खटकली आणि त्याला कमी करण्यासाठी सुनियोजित बेत आखला.
गावातील एका रंगेल प्रकरणात बातमी प्रकाशित न करण्यासाठी काही निवडक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी दिवाळी
साजरी केली. त्यात स्वत: हात धुतले असतानाही शहर बातमीदाराविरुद्ध खोटी
तक्रार दाखल केली. त्याचदिवशी जिल्हास्थळी संपादक महोदयांनी कार्यशाळा
आयोजित केली होती. त्यामुळे या तक्रारीची खबर संपादकांना मिळाली. त्यांनी
कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपला गणवीरचक्र चालविला आणि एका बालक बातमीदार माणसाची
लेखणीच कापली. उद्यापासून काही दिवस लिहू नका, असे सांगण्यात आले.
त्यामुळे शहर बातमीदार सेवेतून कमी झाला. याच आनंदाचा उत्सव साजरा
करण्यासाठी तालुका बातमीदाराने मधूबन हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती.
आपण शहर बातमीदाराचा कसा पत्ता कट केला, हे सांगताना आनंदाचा तोल घसरला आणि
मधुबनात वसंत डोलू लागला होता. या घटनेची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून
सुरू आहे. महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या बातमीदाराने सोडलेला संयम आणि
गावभर झालेली बदनामी ही शिक्षकीपेशसह उदय भविष्यपत्रालाही मान खाली
घालायला लावणरी आहे. विशेष म्हणजे सदर बातमीदार विदर्भ ज्युनिअर
प्राध्यापक संघाचे जिल्हा सचिव म्हणून नुकतेच नियुक्त झाले आहेत.