अहमदनगर- रायटर बदलल्याने घोळात सापडलेल्या सकाळच्या येथील साहेबाने
हाताखाली काम करणार्या ‘मुरली’चे शेती विषयक लेख, बातम्या स्वत:च्या
असल्याची फाईल तयार केली आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे पुरस्कारासाठी
सादर केली. या खात्याशी संबंधित मंत्र्याच्या घरचा गडी असल्याचे अनेक
वर्षांपासून वागत असलेल्या ‘बाळू’ची फाईल समोर येताच इतक्या वर्षांची सेवेची
बक्षिसी म्हणून बाळूला पुरस्कार जाहीर झाला.
वास्तविक पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या बातम्या, लेख हे ‘मुरली’चे असल्याची माहिती माहिती अधिकारात पुढे आली आहे. ‘राम’ गेल्यानंतर ‘विठ्ठल’ आणि ‘कैलास’वर भिस्त राहिलेल्या ‘बाळू’ने आता पुरस्कारासाठी ‘मुरली’ची फाईल पाठवायचे सोडून ‘मुरली’चे लिखाण आपलेच असल्याचे भासवले. आवृत्ती प्रमुख या नात्याने कनिष्ठांना श्रेय द्यायचे सोडून आपल्याला श्रेय घेणार्या ’साहेबा’ची ही जुनीच वृत्ती असल्याची चर्चा आता झडू लागली आहे. ‘मुरली’च्या ज्या बातम्यांमुळे पुरस्कार मिळाला ती फाईलच आता पुण्यात अभिजित पवारांना सोपविण्यासाठी आतापर्यंत अन्याय झालेल्या सकाळमधील काही ग्रामीण वार्ताहरांनी पुढाकार घेतलाय! अभिजित पवार आणि सकाळ व्यवस्थापन याची कितपत दखल घेते हे पाहणे जास्त महत्वाचे ठरले आहे. ‘नाच करे बंदर और माल खाये मदारी’ या हिंदी वाकप्रचाराचे विडंबन आता जिल्ह्याच्या पत्रकारीतेत ‘नाच करे मदारी और माल खाये बंदर’ असे गमतीने केले जाऊ लागले असून यातील मदारी आणि बंदर कोण याची चर्चा नगर शहरातील पत्रकार चौकाजवळील टपरीवर जास्तच रंगली आहे.