अकोल्यात 'दिव्य'च्या मिटिंगमध्ये 'एनई'चा धिंगाणा

अकोलयात गुरुवारी चांगलेच 'दिव्य' घडले. भोपाळशेठच्या पेपरात रोज सकाळी आकाराला मीटिंग होते. गुरुवारी सकाळच्या मिटिंगमध्ये मराठीतील अ, आ, इ, देखील न कळणाऱ्या व मराठी पत्रकारितेचा गंध ही नसणाऱ्या वृत्तसंपादकाने (एनई) गलाच धिंगाणा घातला. अतिशय अश्लील भाषेत मध्यप्रदेशातील मूळ 'कुळ' असलेल्या या 'एनई'ने भर बैठकीत रिपोर्टर व फोटोग्राफरला शिविगाळ केली. मालकाच्या आविर्भावात त्याने मीच 'दिव्य' मालक असल्याचे सांगितले. "तुम्हाला येथून हाकलून देईल, मीच इथला हुकुमशहा आहे, मी म्हणेल तसेच काम करावे लागेल; अन्यथा निघून जा," अशा धमक्या त्याने दिल्या.

मुळात बाहेरच्या राज्यातील 'कुळ' अकोल्यात थेट वृत्तसंपादक सारख्या महत्त्वाच्या पदावर बसवल्याने अकोल्यात भोपाळशेठच्या पेपरची स्थिती 'दिव्य' झाली आहे. या 'एनई'सह आणखी दोघांच्या मनमानी कारभाराला व अंतर्गत गढूळ राजकारणाला कंटाळून गेल्या सात महिन्यात ८ रिपोर्टर व फोटोग्राफर पेपर सोडून गेले. नवीन एकही माणूस यायला तयार नाही. कार्यरत रिपोर्टर व फोटोग्राफर ही सोडून जायच्या मानसिकतेत आहेत.

पेपरला राजकारणाचा 'दिव्य' अड्डा बनवून टाकलेल्या मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारक बनलेल्या संपादकाला आपणच खुर्चीवर बसवलेल्या बगलबच्च्याची अरेरावी सहन होते का तेच आता बघायाचेय. महाराष्ट्रात कोणतीही मान्यता न मिळवू शकलेला हा संपादक पुन्हा रतलामी शेव खायला परत गेलाय. आता आपलीच माणसे असा धुमाकूळ घालताहेत म्हणाल्यावर यांना 'बोकडदाढी' खाजवण्याशिवाय पर्याय नाही.

जळगावात काही दिवसांपूर्वी 'फद्या' संपादकाच्या नादी लागून त्याच्या 'म्हमद्या'ला स्थापित करण्यासासाठी 'बोकडदाढी'ला पद्धतशीररीत्या वापरले गेले. कुठलीही शहानिशा न करता हे काँग्रेसप्रचारक संपादक महोदय कुचकामी 'फद्या'च्या नादी लागले आणि कामाच्या माणसाला घालवून बसले. तेव्हा सातत्याने चर्चेत असलेले 'दिव्य' उत्पादन आता केवळ प्रचारकी पत्र बनून 'छपाई' करीत आहे. सातत्याने बोल्ड आणि बिनधास्त बातम्या वाचण्याची सवय असलेल्या जळगावकरांना आता ही पुढारयांची 'पटवे'गिरी, चाटूगिरी आजीबात रुचत नाहीये. त्यामुळे वितरणाचे आकडे दिवसेंदिवस घसरत चालले आहेत; वर्गणीदार बनवायला समस्या येत आहेत. आता केवळ 'सेटर' आणि त्याच्या चमच्यांचे कोंडाळे उरले आहे. या 'फद्या'ला एकाही महत्त्वाच्या पेपरमधील माणूस फोडता आला नाही. जळगावकरांना त्यामुळे आता 'फद्या-म्हमद्या'चा तमाशा बघण्यावाचून पर्याय उरलेला नाही आणि प्रचारक संपादकाला इंदुरी-भोपाळी बसून आपली 'बोकडदाढी' कुरवाळीत हा फसलेला वग सहन करण्यावाचून काही उद्योग उरला नाही. मुळव्याध झाल्यागत 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही,' अशा वेदना आता 'बोकडदाढी'वाल्याला होत आहेत; पण आपलीच चूक, कबूल कशी करणार? मुळव्याधच्या वेदना काय असतात ते 'फद्या'च्या लंपट, चमच्याला विचारून दाढी खाजवा हो बोकड'बाबा'!