समर खडस यांचा राजीनामा

मुंबई - अवघ्या चार महिन्यातच समर खडस यांनी लोकमतच्या सहाय्यक संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. लोकमतमधील अंतर्गत राजकारणाणाला कंटाळून खडस यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.खडस लवकरच महाराष्ट्र टाइम्समध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून जॉईन होणार आहेत.
खडस यांनी दिव्य मराठीचा राजीनामा देवून लोकमतमध्ये चार महिन्यापुर्वी प्रवेश केला होता.त्यांना सहाय्यक संपादक (राजकीय) पद देण्यात आले होते.मात्र त्यांची लोकमतमध्ये चांगलीच घुसमट सुरू होती.लोकमतमध्ये राजकीय बीटवर सुध्दा पक्षपात करण्यात आला होता.
खडस यांना रिपाइं,शिवसेना आणि मनसे तर अतुल कुलकर्णी आणि यदु जोशी यांना कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षावर लिहिण्याचे अधिकार देण्यात आले होते .त्यामुळे खडस नाराज होते.मला सर्व पक्षावर लिहिण्याचा अधिकार द्या,अशी खडस यांची मागणी होती,पण समूह संपादक दिनकर रायकर यांनी जोशी - कुलकर्णी यांची पाठराखण केली तर खडस यांना दुय्यम वागणूक दिली.त्यामुळे खडस यांनी लोकमतचा राजीनामा देणे पसंद केले.
खडस यांचा राजकीय अभ्यास चांगला असला तरी लोकमतमधील राजकारणाचा अभ्यास करण्यात ते कमी पडले.असो खडस लोकसत्ता.,दिव्य मराठी,लोकमत मार्गे म.टा.मध्ये जॉईन होत आहेत.

संदीप प्रधान नाराज
एकेकाळी समर खडस आणि संदीप प्रधान लोकसत्तामध्ये रिपोर्टर होते.प्रधान सध्या म.टा.मध्ये ब्युरो चिफ (राजकीय)आहेत.त्यांच्या डोक्यावर आता समर खडस यांना बसविण्यात येणार असल्यामुळे प्रधान नाराज आहेत.ते कदाचित म.टा.चा राजीनामा देवून लोकमतमध्ये जावू शकतात.