इंदापुरी हिरोची संत्रानगरीत हाणामारी!

'स्मार्ट' वृत्तपत्राच्या संत्रानगरीतील इंदापुरी हिरोने नुकतीच विद्यापीठाच्या प्रांगणातच हाणामारी केली. त्याने एका पत्रकाराला विद्यापीठातील अधिकारी व विद्यार्थ्यांसमोरच वाईट भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन नुकतेच एका समारंभासाठी संत्रानगरीत आले होते. कस्तुरीरंगन माध्यमांशी बोलत असताना या हिरोने त्यांना मध्येच थांबविले. त्यावर कस्तुरीरंगन यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. इतकेच काय पण याने इंग्रजी वृत्तपत्रातील महिला पत्रकारालादेखील हैराण करुन सोडले. कस्तुरीरंगन जे बोलले त्यातील महत्त्वाची बातमी दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रात छापून आली; मात्र 'स्मार्ट'मध्ये नाही! तसे पाहिले तर हा हिरो पत्रकार शिक्षण सांभाळतो. परंतु विद्यापीठात एखादा अधिकारी असल्यासारखाच फिरतो व सर्वांना शहाणपणाचे सल्ले देतो.

मोठमोठ्याला जाहिराती, स्कीम्स यांच्यामुळे सुरुवातीला संत्रानगरीत 'स्मार्ट'चे  इंजिन सुरुवातीला जोरात धावले. परंतु काही काळाने संपादक सपशेल `पराजित` झाले आहेत. त्यांनी स्वतःच्या जवळच्या माणसांची अक्षरशः खोगीरभरती करुन ठेवली आहे. 'अतुल'नीय कामगिरीचे केवळ दावेच! या जोडगोळीने 'भविष्यपत्राच्या' उदयात स्वतःचे हात धुवून घेतले आणि तेथून सटकले. कावळ्याची नजर आणि कोल्ह्याची चतुराई दोघांतही भरलेली आहे.
'स्मार्ट'चा भर बातम्यांहून जास्त कॅम्पेनवरच दिसतो. मग इव्हेंट मॅनेजमेन्ट कंपनीच का काढली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. बरे येथील टीममध्येदेखील वर्चस्वाची लढाई सुरू आहे! आता तर मुंबईचेच पत्र पाठवा, अशी जोरदार मागणी होत आहे.


'राखी'चा बाय-बाय
'स्मार्ट'मधील राखी राजीनामा देऊन पुन्हा 'लोकमान्य लोकशक्ती'तील स्वगृही परतल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात 'लोकमान्य'ची नागपूर एडिशन गुंडाळून त्याचे काम मुंबईतून सुरू झाले होते. आता हीच एडिशन पुन्हा नव्याने लाँच केली जाईल, अशी चर्चा आहे.