"लोकशाहीच्या मंदिरात नंगानाच; आमदारांनी कपडे काढले; लाज सोडली!" अशी जोरदार लेखणी चालविणारे 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'च
आता 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळायला' निघालेले आहे. विशेष म्हणजे
खासदार असलेल्या संपादकाला चक्क इथल्या बदमाश त्रिकुटाने शेंडी लावली आहे.
इथला 'बारावी नापास' म्होरक्या म्हणजे जणू पंढरपूरचा बडवाच आहे. तिथे तरी
राज्य सरकारने खमकेपणाने बडव्यांचे राज्य मोडीत काढले आहे. मात्र, 'सदगुरु
दर्शन' होउनही 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' काही 'बारावी नापास'
बडव्यापासून मुक्त होऊ शकलेले नाही.
खासदारांचेच या बडव्यावाचून पान हलत नाही, असा प्रचार हा बडवाच त्याच्या चमच्यांमार्फत करत राहतो. वास्तविक खासदारांना 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' हाताशी धरून बाहेर कोण काय धंदे करतोय, याची कल्पनाच नाही. आताही बडव्याने त्यांना अंधारात ठेवून एका बदमाश आरोपीला हाताशी बाळगण्याचा, पावन करून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आश्चर्य म्हणजे वर्षानुवर्षे इथे काहीही न करता खुर्ची उबवत असलेल्या खानदेशी आणि बडव्यामधून विस्तव जात नाही; पण या बदमाशाला पुनर्स्थापित करण्यात खान्देशीने बडव्याची मदत केली आहे. वर्षानुवर्षांचा निष्ठावंत असूनही 'ठाणे-नाशिक-कोकणापुरते मर्यादित' केले गेलेल्या जुन्या, हाडाच्या सैनिकाचा व रत्नागिरीवाल्या 'विशेष मर्जीतल्या माणसाचा' विरोध डावलून 'मराठी माणसांना फसविणारा बदमाश' आता 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये घुसविला जात आहे.
अंधारात ठेवले म्हणून खासदारांची भूमिका नैतिकदृष्ट्या योग्य ठरविता येणार नाही. त्यांचे बडव्यावरचे प्रेम धृतराष्ट्राची आठवण आणल्याशिवाय राहत नाही. पण भल्या माणसाचे प्रेम मिळाले म्हणून काही दुर्योधन 'महाभारता'तही सुधारला नाही व आजही सुधारणार नाही. ती प्रवृत्ती आहे. आणि हीच प्रवृत्ती 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये बदमाशांना घुसवून स्वत:ची व्यक्तिगत कामे मार्गी लावण्याची सोय करू पाहत आहे. या अशा दुर्योधनी प्रवृत्ती खासदारांनी वेळीच ठेचून काढून त्यांचे बदमाश मनसुबे उधळून लावले नाहीत तर त्यांचे सारे 'बाइटस' म्हणजे 'बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी' ठरतील. वर विरोधक 'दिव्याखाली अंधार' आणि 'मराठी माणसांना फसविणारा बदमाश' हाताशी धरणारे हे काय मराठी माणसाचे भले करतील', असे म्हणायला मोकळे!
आश्चर्य म्हणजे, गोरेगावमध्ये ज्या मराठी माणसांची "म्हाडाच्या घरांचे आमिष दाखवून" फसवणूक केली गेली, ती मंडळी न्यायासाठी 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' प्रकाशित करणारयांच्या दारीही जावून आली. खरेतर ही सारी फसविली गेलेली मराठी माणसे मराठी माणसाचे भले करण्यासाठी झटणारी, 'प्रबोधन' करणारी कार्यकर्तेच आहेत. 'प्रबोधना'त गुंतलेल्या 'सैनिकांना' फसविणारे 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये आरामात शिरू शकतात, हा जर संदेश बाहेर गेला तर तो निश्चितच खासदारांच्या अन वृत्तपत्राच्या; तसेच पक्षासाठीही हितकारक ठरणार नाही. यात बडव्यांचे किंवा इतर कुणा 'भडवेगिरी' करणारयांचे काहीही नुकसान होणार नाही, पण 'प्रबोधन'च्या पाठीराख्यांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या कार्यकर्त्यांना, मराठी माणसाला फसविणारयांना 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये मुद्दाम घेतले जाते, त्यांना डिवचले जाते ... हाही संदेश घातकच ठरेल! आणि एकूणच इतरांकडून सदशील वर्तनाची अपेक्षा धरणारयांनी अंधारात राहून कसे चालेल? बडव्यांचे लाड अजून किती दिवस पुरविणार?
नैतिकता हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, ज्याचा-त्याचा दृष्टीकोन आहे, 'विशेषाधिकार'ही आहे! मात्र, एरव्ही "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी" असा खणखणीत आणि 'रोखठोक' बाणा जपणारे 'बडव्या'पुढे इतके आगतिक का होतात; की त्याची काहीही थेरं खपवून घेतली जावीत? बडव्यांचा तर मूळ धंदाच दलालीचा; त्याच्याकडून 'नीर-क्षीर-विवेका'ची काय अपेक्षा कुणाला असणार? मात्र, हा बेरक्या, उभा महाराष्ट्र, देशाच नव्हे तर जगभरातील मराठी माणूस 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मधील 'रोखठोक'पणाला सलाम करतो! बेरक्याला या 'रोखठोक'पणाचा अतीव आदर आहे; पण 'बडव्या'ला आपण आवरायाला हवे! ही बडवी मंडळी बाहेर 'सारे काही आपल्यासाठी' करावे लागते, असे सांगत सुटते. आम्ही जाणतो, की हे असले धंदे आपले नव्हेत; आपला त्याला कसला आलाय आशिर्वाद आणि आदेश? ... आम्ही जाणतोय; मात्र इतर कुणाकुणाला सांगणार? ते तर बडव्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार! 'भडवेगिरी' त्यांची आणि बदनाम मात्र नाहक आपण होणार! 'मराठी माणसांना फसवूनही बदमाश 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये मिरवू लागला की मग मात्र जगालाही यात काहीतरी 'काळे-बेरे' वाटेल! कुणाकुणाचे प्रबोधन करणार? त्यापेक्षा बडव्यांना चापून, काळी कृत्ये करणारया काळ्यांना ढुंगणावर लाथ मारणे हाच 'रोखठोक' बाणा जपण्याचा मार्ग आहे. नाहीतर मग आम्हालाही म्हणावे लागेल की, "काळ्याच्या ढुंगणावर उगवलं बाभूळ!"