कृषी 
मासिक 'अॅग्रो वर्ल्ड'चे जळगावात प्रकाशन गुढीपाडवाच्या मुहूर्तावर 
राज्यस्तरीय मराठी कृषी मासिक 'अॅग्रो वर्ल्ड'चे (Agro World) जळगावात 
प्रकाशन करण्यात आले. जैन उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन 
यांच्या हस्ते पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी जैन समूहाचे जनसंपर्क व
 प्रसिद्धी अधिकारी विनोद रापतवार, 'अॅग्रोवर्ल्ड'चे संपादक शैंलेंद्र 
चव्हाण 9881300564, विवेक काळे, 'प्रल्शर बायोटेक'चे संचालक निखिल 
सुर्यवंशी, अनंत बागुल आदी उपस्थित होते. 64 पाने व बहुरंगी छपाईसह 
प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील शेती व शेतकरी यांचा वेगळ्या पद्धतीने 
आढावा घेणारे 'अॅग्रो वर्ल्ड' मासिक कृषी व ग्रामविकासाच्या उन्नतीसाठी 
कटीबद्ध राहील, असा चव्हाण यांचा दावा आहे.
 

 
 
 
