औरंगाबाद / अकोला - दिव्य मराठीच्या औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक धनंजय लांबे आणि अकोला आवृत्तीचे निवासी संपादक प्रेमदास राठोड यांना भोपाळशेठने काही दिवसांपुर्वी भोपळा दिला.त्यानंतर लांबे म.टा.मध्ये आणि राठोड लोकमतमध्ये गेले.परंतु भोपाळशेठला नवा पर्याय अजूनही शोधून सापडला नाही.
भोपाळशेठच्या औरंगाबाद आवृत्तीसाठी लोकमतचे एक माजी कार्यकारी संपादक,एक माजी दिल्ली प्रतिनिधी आणि सकाळचे एक अडगळीत पडलले कार्यकारी संपादक इच्छुक आहेत.परंतु भोपाळशेठला नवा दमाचा निवासी संपादक हवा आहे.अकोला आवृत्तीचही तीच बोंब आहे.या आवृत्तीसाठी सकाळचे एक निवासी संपादक सोडले तर कोणीच इच्छुक नाही.
औरंगाबाद आवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या काही जणांनी भोपाळला जावून भोपाळशेठची भेट घेतली.मुलाखती दिल्या परंतु पुढे काहीच नाही.घोडे कशात अडले आहे,हे कोणालाच माहित नाही.असो,लवकरात लवकर भोपाळशेठला नवे निवासी संपादक मिळो,हीच शुभेच्छा.