लोकमत कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात

राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकरयांवर आलेले संकट आणि त्यातून न भरुन येणारे झालेले नुकसान लक्षात घेता लोकमतच्या सर्व कर्मचारयांनी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचारयापासून संचालकांपर्यंत सगळ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन यासाठी दिले आहे. १७ लाख ६० हजार रुपयांचा हा धनादेश आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी म्हणून देण्यात आला. मुख्य सचिव सहारिया आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सचिव विकास खारगे यांच्याकडे लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक (एचआर) बी.ए. मुळे यांच्या हस्ते सूपूर्त करण्यात आला. यावेळी सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी, उपव्यवस्थापक सचिन लिगाडे, अमोल निला, रुपसिंग राजपूत यांचीही उपस्थिती होती.