जळगावातील साठ वर्षे जुने वृत्तपत्र कात टाकणार!


जळगावातील साठ वर्षे जुने दैनिक असलेले 'जनशक्ती' लवकरच कात टाकणार आहे. या दैनिकाच्या मालकीचे हस्तांतरण नुकतेच पूर्ण झाले आहे. मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असलेले पुण्यातील सिद्धीविनायक ग्रुपचे कुंदन ढाके या तरूण उद्योजकाने या खानदेशातील पत्रकारितेच्या उज्ज्वल वारशाला जतन करण्याचा, फुलविण्याचा आणि ज्या मातीत जन्मले तिचे पांग फेडण्याचा संकल्प सोडला आहे. वेगळ्या क्षेत्रात असले तरी पत्रकारितेच्या आवडीतून त्यांनी 'जनशक्ती'ला उर्जितावस्था आणून देण्याचे ठरविले आहे. 

कुंदन ढाके हे केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याणसंबंधातील शासकीय समितीचे उपाध्यक्ष आहेत. (Vice President, NIPCCD,Ministry of Woman And Child Dev.,Govt of India) सिदधीविनायक समूह रिअल इस्टेट, कृषीउद्योग, शिक्षण आणि इंजीनिअरिंग या क्षेत्रात कार्यरत असून वेगाने विस्तारात आहे. सिद्धीविनायक स्कायस्क्रेपर्स ही पुण्यातील विश्वार्साह बिल्डर फर्म मानली जाते. हात घालेल तिथे सोने करेल, असे या समूहाचे आजवरचे कार्य आहे. 
जनशक्ती दैनिकाचे पहिल्या टप्प्यात जळगावात मजबुतीकरण आणि उर्जीकरण याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे समजते. त्यानंतर पुणे, मुंबई आणि नाशिक व इतरत्र टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचीही योजना आहे. याशिवाय मुंबईत वेगवान व वृत्तपत्रजगतात धमाल उडवून देईल, अशा प्रोजेक्टवरही हा समूह काम करीत आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे नव्या जमान्यातील माध्यमातील मैलाचा दगड ठरावा, असे 'स्मार्ट' पाउल असेल. खूप काही करायचे असले तरी त्यात कुठलीही घाई ण करता सातत्य वं विश्वार्साहतेला प्रथम प्राधान्य देण्याचेच समूहाचे धोरण असेल. माध्यम व्यवसाय हा इतर सर्व व्यवसायांपासून पूर्ण अलिप्त व स्वतंत्र ठेवला जाणार आहे. माध्यम प्रोजेक्टमध्ये पूर्ण प्रोफेशनलीझम राखले जाणार असून इतरांपेक्षा वेगळा ठसा उमटवणारे, समाजाशी नाळ जोडणारे वृत्तपत्र देण्यावर सारा भर राहील. लवकरच जळगावातील पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातील दोन कल्पक व 'दादा' माणसे या प्रोजेक्टशी जुळणार असल्याचीही चर्चा आहे. 
खानदेशातील संक्षिप्त माध्यम इतिहास 

धुळे जिल्ह्यात जळगावचा समावेश असताना 1868 साली गणपत बहाळकर वैद्य यांनी सुरू केलेल्या ‘खान्देश वैभव’ (पहिले संपादक बळवंत करंदीकर) या शिळा प्रेसवर छपाई होत असलेल्या वृत्तपत्रानंतर  तब्बल 13 वर्षांनी जळगावात ‘प्रबोधचंद्रिका’ नावाने नानासाहेब फडणीस यांनी वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर दुसरया दिवशी (4 जानेवारी) लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ सुरू केला होता. ‘ प्रबोधचंद्रिका’ शिळाप्रेसवर छापले जात होते. त्या वेळी लोकमान्यांचा राष्ट्रवाद खान्देशात प्रबोधचंद्रिकेच्या माध्यमातून रुजला. 1868 ते 1935 दरम्यान तालुकास्तरावरूनही अनेक छोटी मोठी साप्ताहिके सुरू झाली. जळगावात विठ्ठल चावदस नेहेते यांनी 1 नोव्हेंबर 1935 ला ‘बातमीदार’ सुरू केले. सुरुवातीला ते साप्ताहिक होते परंतु 1953 ते 54 पासून ते दैनिक झाले. या काळात मराठी मुलूख सोडून बातमीदारचे अंक अमेरिका, जर्मनीत राहणारे महाराष्ट्रीयन लोकही मागवत होते. त्यामुळे त्याचा खप 27 हजारांपर्यंत पोहोचला होता. 1935 ते 1965 हा कालखंड जळगावसाठी लक्षणीय ठरला. या काळात 100 नियतकालिके जळगाव जिल्ह्यातून निघायला लागली होती. 17 जानेवारी 1956 ला ‘जनशक्ती’ची सुरुवात जळगावात झाली. 1968 मध्ये ‘गावकरी’ सुरू झाला. 1 एप्रिल 1975 ला नागपूरहून ‘लोकमत’ची खान्देश आवृत्ती सुरू झाली. 15 डिसेंबर 1977 रोजी जळगावहून लोकमतची छपाई सुरू झाली. 17 मार्च 1990 रोजी ‘सकाळ’ नाशिकहून सुरू झाला. त्या वेळी जळगाव आवृत्तीही नाशिकहून निघत होती. 11 आगस्ट 2004 ला सकाळची जळगावहून खान्देश आवृत्ती सुरू झाली. दरम्यान, 24 डिसेंबर 1997 ला जळगावात देशदूतही दाखल झाला. त्यानंतर 11 सप्टेंबर 2011 रोजी ‘दिव्य मराठी’चे जळगावात आगमन झाले. 

(इतिहास संदर्भ : जितेंद्र झंवर, मुख्य उपसंपादक, दिव्य मराठी - जळगाव # https://plus.google.com/114687268910252020390/posts/JmnAutijJ8f)
सिद्धीविनायक गृपविषयीची अधिक माहिती खालील लिंकवर पाहा -