अंबाजोगाई - दै.विवेकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजीत
जगताप(गाठाळ) यांनी फेसबुकवर लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण केले. या
विश्लेषणाचा लिहिलेला लेख वाचून आ.पृथ्वीराज साठे अनावर झाले. या संदर्भात
माझ्याविरोधात लेख का लिहिला या कारणावरून आ.साठे यांनी दै.विवेकसिंधुचे
संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांना अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ व धमकी
दिली. हा प्रकार रविवारी रात्री 8.00 ते 9.30 यावेळेत झाला. या घटनेची
तक्रार प्रा.गाठाळ यांनी पोलिसात दिली आहे. या घटनेचा अंबाजोगाई पत्रकार
संघाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. मुंबई येथील पत्रकार
हल्लानियंत्रण समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त
करून या घटनेची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांना दिली आहे.
लोकसभेच्या मतमोजणीनंतर दै.विवेकसिंधुचे वृत्तसंपादक अभिजीत जगताप(गाठाळ)
यांनी फेसबुकवर ‘‘भविष्याच्या धास्तीने आ.पृथ्वीराज साठेंनी अंथरून
धरले’’या आशयाचा लेख लिहिला. हा लेख लिहिल्याच्या कारणावरून रविवारी रात्री
8.00 वा.आ.साठे या प्रकरणाची विचारणा करण्यासाठी प्रा.गाठाळ यांच्या घरी 8
ते 10 जणासोबत गेले. यावेळी प्रा.गाठाळ एका कार्यक्रमात असल्याने
घराच्याबाहेर अर्वाच्च भाषेत ते गाठाळ कुटूंबियांना शिव्या देवू लागले. हा
प्रकार गाठाळ कुटूंबियांच्या समोर सुरू होता. प्रा. गाठाळ घरी नसल्याचे
पाहून आ.साठे व त्यांचे सहकारी दै.विवेकसिंधु शहर कार्यालयाकडे आले.तेथे
प्रा.गाठाळ त्यांची भेट झाली. यावेळी आ.साठे यांनी प्रा.नानासाहेब गाठाळ
यांना अपमानास्पद वागणूक दिली. शिवीगाळ करून तुम्ही दैनिक कसे चालवता,
तुमचा मुलगा रस्त्यावरून कसा वागतो अशा धमक्या त्यांना दिल्या. व ते निघून
गेले. या घटनेची तक्रार प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये
केली आहे.
आ.पृथ्वीराज साठे यांचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध
फेसबुक वर विरोधात लेख का लिहिला ? या कारणावरून आ. पृथ्वीराज साठे यांनी रविवारी रात्री दै. विवेकसिंधू चे संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांना अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ व धमकी दिली. या घटनेच्या अंबाजोगाई पत्रकार संघाच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
अंबाजोगाई पत्रकार संघाची बैठक सोमवारी सायंकाळी नगर परिषदेच्या सभागृहात झाली. या बैठकीत सर्वांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. पत्रकार संघाचे विश्वस्त जेष्ठ पत्रकार अमर हबीब, जेष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश लखेरा, उपाध्यक्ष हनुमंत पोखरकर उपस्थिती होते.
यावेळी बोलताना अमर हबीब म्हणाले की, सत्तेची मस्ती वाढल्याने लोकप्रतिनिधींना आपल्या विरोधात लिहलेले सहन होत नाही. आगामी काळात पत्रकारांकड बोट दाखविण्याची हिम्मत कोणी करणार नाही. यासाठी पत्रकारांची एकजुट महत्वाची असल्याचे ते म्हणाले. आ.साठे यांनी पत्रकार एकजूट महत्वाची असल्याचे ते म्हणाले. आ.साठे यांनी पत्रकार संघाची माफी मागावी अन्यथा पत्रकार संघ पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल. यावेळी झालेल्या प्रकाराची माहिती प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी दिली. यावेळी सुदर्शन रापतवार,हनुमंत पोखरकर, दत्तात्रय अंबेकर, अविनाश मुडेगांवकर, अभिजीत गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केला. पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी यावेळी आ.साठे यांच्या तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

पत्रकार हल्ला नियंत्रण समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख घेणार गृहमंत्र्यांची भेट
अंबाजोगाई येथील दै. विवेक सिंधुचे संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांना आ. पृथ्वीराज साठे यांनी अपमानास्पद वागणुक देऊन शिवीगाळ व धमकी दिल्याची माहिती मुंबई येथील पत्रकार हल्ला नियंत्रण समितीचे नियंत्रक एस.एम. देशमुख यांना समजताच त्यांनी प्रा. गाठाळ यांच्याकडून घटनेची माहिती घेतली व या घटनेचा निषेध नोंदविला. सोमवारी सायंकाळी ते या घटनेची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेट घेऊन देणार आहेत.