जळगाव- लोकमतच्या जळगाव आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांची औरंगाबादला बदली करून ऋषी दर्डांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
सुधीर महाजन हे गेल्या पाच वर्षापासून लोकमतच्या जळगावच्या आवृत्तीचे संपादक म्हणून काम करीत होते.त्यांच्या काळात मकरंद देशमुख,संदिप बिष्णोई,अमोल गुप्ते हे तीन जनरल मँनेजर बदलून गेले.सध्या प्रवीण चोपडा जनरल मँनेजर आहेत.
जळगावमध्ये लोकमतचा खप विविध कारणामुळे उतरला आहे.तसेच बिझनेस पण कमी झाला आहे.त्याचे खापर जनरल मँनेजरवर फोडण्यात आले होते.मात्र खरे कारण संपादकीय विभाग असल्याचा जावाईशोध आता लागला आहे.
महाजन यांच्याविरोधात अनेक कर्मचारी विरोधात गेले होते.त्यांच्याविरूध्द असंख्य तक्रारी होत्या.एक वर्षापुर्वी ऋषी दर्डांनी प्रत्येक कर्मचा-यांची फेस टू फेस भेट घेवून अडचण जाणून घेतली होती.त्यात सुधीर महाजन यांचा त्रास आणि जाच कारण समोर आले होते.त्यामुळे महाजन यांची औरंगाबादला बदली करण्याचे नक्की झाले होते.पण जळगावला दुसरा संपादक मिळत नव्हता.जळगावहून पुण्याला गेलेले विजय बाविस्कर परत जळगावला येण्यास इच्छुक होते,पण ऐनवेळी त्यांनी कट मारला,त्यामुळे दर्डांना जळगावसाठी संपादक पाहिजे अशी जाहिरात देण्याची पाळी आली.
महाजन यांची औरंगाबादला बदली करण्याची दोन कारणे सांगितली जात आहेत.
एक म्हणजे महाजन यांची औरंगाबादला बदली केल्यानंतर जळगावमधील असंतोष थांबेल आणि त्यांच्यावर दस्तुरखुद्द ऋषी दर्डा यांची नजर राहील ( कारण ऋषी दर्डा सर्वात जास्त काळ औरंगाबादला असतात )
दुसरे म्हणजे कार्यकारी संपादक चक्रधर दळवी यांचे पंख छाटता येतील.दळवी यांचे कर्मचार्यामध्ये प्राब्लल्य आहे.दळवींच्या डोक्यावर महाजन यांना बसविल्यास त्यांचे प्रस्थ कमी होईल....दळवींना शह देण्यासाठीच महाजन यांना औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.
बरोबर आहे की नाही,ऋषी दर्डांनी एका दगडात दोन पक्षी मारले ?
जाता - जाता : जे जिल्हा प्रतिनिधी पाच वर्षापासून एकाच जागेवर ठाण मांडून आहेत,त्यांच्या येत्या जूनमध्ये बदल्या होणार आहेत.त्यात यवतमाळ,चंद्रपूर,सांगली ,धुळे परभणी,हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधींचा समावेश आहे.
.............................
लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांची औरंगाबादला बदली झाल्यामुळे जळगावमधील कर्मचाऱ्यांत आनंद...अनेकांनी वाटले पेढे...काहींनी पार्टी दिली...