फलटण - एका संघटनेच्या
पाच ते सात स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी दैनिक "सकाळ' व दैनिक "ऐक्य'
यांच्या येथील कार्यालयांवर आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास हल्ला करून
कार्यालयातील संगणक व दूरध्वनींची मोडतोड केली. खिडक्यांच्या काचाही
फोडल्या. कार्यालयात उपस्थित असलेल्या बातमीदाराला गजाने जीवे मारण्याचा
प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या हल्ल्यात
"सकाळ' कार्यालयाचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी 11 वा 50 मिनिटांनी हातात भगवा ध्वज घेतलेले एका संघटनेचे चार कार्यकर्ते प्रथम ऐक्य वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले. तुम्ही आमच्या बातम्या छापत नाही, असे म्हणत त्यांनी तेथील कर्मचारी विनायक शिंदे यांना दमबाजी केली. तेथील एक संगणक लोखंडी गजाने फोडला. त्यानंतर कार्यालयातील काचेच्या तावदानांची तोडफोड करून कार्यालय प्रमुखांच्या केबिनमधील कागदपत्रे व अन्य बाबी फेकून दिल्या. त्यानंतर शिवीगाळ करून संशयित चौघांनी आपला मोर्चा "सकाळ' कार्यालयाकडे वळवला. त्या वेळी अन्य तिघे जण उभे होते. या सात जणांपैकी तिघे जण बाहेर थांबले होते. चौघांनी "सकाळ' कार्यालयात प्रवेश केला व आतून कडी लावली. "तुम्ही आमच्या बातम्या छापत नाही,' असे म्हणत खिडकीची तावदाने फोडली. दूरध्वनी संच आपटून फोडला. "सकाळ'चे बातमीदार संदीप कदम त्या वेळी संगणकावर काम करत होते. त्यांनी संबंधितांना "असे करू नका,' अशी विनंती केली. त्यावर हल्लेखोरांतील एकाने लोखंडी गज त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी तो प्रहार चुकवला; मात्र गजाचा फटका बसल्याने संगणकाचा मॉनिटर फुटला. त्यांनी फॅक्स मशिनही तोडले. जाताना बाहेरून कडी लावून ते निघून गेले.
या घटनेची माहिती मिळताच शहरात दिवसभर तिचे पडसाद उमटले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही कार्यालयांना भेटी देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिस उपअधीक्षक राहुल माकणीकर, पोलिस निरीक्षक संजय बाबर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन झालेल्या हल्ल्याचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी शहर पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर संबंधितांना ताब्यात घेण्याची यंत्रणा वेगाने फिरल्याने सायंकाळी सहा वाजेपर्यंत नवनाथ पाटील (वय 26), दीपक पिंजारे (22 दोघेही रा. आवे ता. पंढरपूर), तुकाराम शेंडगे (24, रा. जांबूल, ता. माळशिरस) व गणेश महाराज शिंदे (30, रा. पिंप्रद ता. फलटण) या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपअधीक्षक राहुल माकणीकर तपास करीत आहेत.
""सकाळ व ऐक्य कार्यालयांवर हल्ले करणाऱ्यांपैकी चौघांना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.''
- अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक