पुढारीची नाशिक आवृत्ती 1 ऑगस्टपासून सुरू होणार...

दैनिक पुढारीची नाशिक आवृत्ती 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.संपादकपदासाठी काल नाशिकात मुलाखती पार पडली.त्यात पुण्यनगरी,लोकमत,सकाळ आणि म.टा.चा प्रत्येकी एक आणि बाहेरचे तीन असे सातजण हजर होते.आता संपादकपदी कोणाची नियुक्ती होणार,याकडे लक्ष वेधले आहे.
त्याचबरोबर कोल्हापूरात ऑल पेज कलरची प्रिंटीग मशिन बसविण्यात आली असून,कोल्हापूरची जुनी मशिन औरंगाबादेत शेंद्रा एमआयडीसीमध्ये बसविण्यात आली आहे.त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली औरंगाबाद आवृत्ती लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिक आवृत्तीची छपाई औरंगाबादमधून होणार की नाशिकमधून याबाबत अधिकृतरित्या कळू शकतले नाही....


..........................

कोल्हापूर - दैनिक पुढारीने ३ ते ५ टक्के पगारवाढ दिली आहे. मात्र ती फारच तुटपुंजी आहे. कोल्हापूरच्या उपसम्पादकांसाठी हसावे कि रडावे असा प्रश्न पडला आहे.
कोल्हापुरात राजारामपुरी केसरी पै दिलीप लोंढे आणि भवानी मंडप केसरी पै सुरेश पवार यांच्यातील सामना सर्वश्रुत आहे. त्यात पद्मश्रीच्या जवळचा कोण याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे भवानी मंडप केसरीनी आपण फारच सक्रिय असल्याचे दाखवण्यासाठी बंद पडलेली सर्व आवृत्त्यांच्या उपसंपादकांची सकाळची बैठक पुन्हा सुरु केली आहे. त्यामुळे उपसंपादक सकाळी ११ वाजता आणि पुन्हा संध्याकाळी ४ वाजता येत आहेत. त्यामुळे वाढलेले ५००-६०० रुपये पेट्रोलमध्येच जात आहेत.
दरम्यान पुढारीला मुंबईत माणसांचा तीव्र दुष्काळ भासत आहे, सानपाडा कार्यालयातील अभिषेक कांबळे या उपसम्पादकापाठोपाठ एकमेव मुद्रित शोधक अमर वाणी यांनीही राम राम ठोकला आहे. कांबळे कृषीवलमध्ये तर अमर वाणी लोकसत्तेत गेले आहेत..