मजीठिया वेतन आयोग लागू करण्यास दर्डाशेठचा नकार

नागपूर - लोकमतच्या दर्डाशेठनेही मजीठिया वेतन आयोग लागू करण्यास नकार दिला आहे.हा वेतन आयोग लागू झाल्यास लोकमत मीडिया ग्रुपमधील जवळपास 600 कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार आहे.मात्र दर्डाशेठकडून नकार येत असल्यामुळे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
सर्वोच्य न्यायालयाने वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना एप्रिलअखेर मजीठिया वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचे निर्देश दिले होते.मात्र मे संपला तरी हा वेतन आयोग दर्डाशेठनी लागू केलेला नाही.
लोकमतमध्ये संपादकीय विभागातील जवळपास 350 आणि इतर विभागातील 250 असे 600 कर्मचारीच कायम नियुक्त आहेत.बाकी सर्व कर्मचारी कंत्राटदार पध्दतीने घेण्यात आले आहेत.जे कायम नियुक्त कर्मचारी आहेत,त्यांनाच या वेतन आयोगाचा लाभ होवू शकतो.मात्र दर्डाशेठ हा वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
त्यामुळे लोकमत कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.त्यांची नुकतीच जळगाव आणि नागपूरमध्ये बैठक झाली आणि पुढील दिशा ठरविण्यात आली.काहीजण न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा विचार करीत आहेत.