आशा आणि दिशा सारेच हरपल्याची नाशिकमधील एका दैनिकाची जळगावातील स्थिती
आहे. भाऊंनी नवा धंदा नवी लोकं असा नवा फतवा काढला आहे. मात्र, त्यात विकेट
धंदा देणारयाचीच जात असून 'धंदे करणारे' आलबेल आहेत. आता अशी माहिती
मिळतेय की तमाम जैन मग ते जामनेरवाले असोत की टेकडीवाले, यांच्याशी 'दूत'
बनून यशस्वी संबंध प्रस्थापित करण्यात संपादकाच्या 'सहाय्यक' कार्याची जाणच
राखली गेली नाही. भाऊ म्हणाले, "आपल्या वाटा वेगळ्या; तुम्ही दुसरीकडे
बघा. नोटीस द्या, महिना आहे अजून!" बरे जळगावात सुरुवातीपासून संगणककार्य
सांभाळलेल्या व्यक्तीचीही कदर केली गेली नाही. ज्येष्ठ 'शुक्ल' 4 या दिवशीच
त्यालाही सांगितले गेले, "आपणही रामराम घ्यावा, दुसरीकडे बघावे!" त्यांना
खरेतर येवून-जावून, उठसूट "पाथ्री" खाण्याची सवय होती. तुम्ही काहीही आणि
कुणालाही खावू लागलात की इतरांना उचक्या लागतातच. स्वत: काहीही खा-खा; पण
इतरांनी कष्टाने खाल्ले तरी काहींना पोटदुखी होते व मग ते वेळ साधतात. अशीच
वेळ साधून जुन्या खोडांनी दोन विकेट्स घेतल्या. आता कसली आली नवी आशा आणि
कसली घेवून बसलाय नवी दिशा?