पुण्यातले
काही फोटोग्राफर्स त्यांच्या शौकामुळे भलेतेच चर्चेत आहेत. परवाचा प्रसंग
तर सर्व पत्रकारांच्या माना खाली घालणारा ठरला..घराघरात मनामनात अशी
बिरुदावली मिरवणा-या एका वर्तमानपत्रातील मंग्याचा तोल काय गेला आणि सा-या पुण्यात चर्चा सुरु झाली.
झाले असे की एका सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स बावधनमधील एका रेसॉर्टमध्ये शनिवारी रात्री होती. त्यासाठी आयोजकांनी वाहनांची व्यवस्था केली होती. रात्रीची पत्रकार परिषद असल्याने आमंत्रित आणि अनाहूत असे अनेक पत्रकार व छायाचित्रकार तेथे आले होते. त्यामध्ये घराघरात मनामनात अशी बिरुदावली मिरवणा-या एका वृत्तपत्रातील अधिकृत सभ्य पत्रकार होते. तसेच हौशी छायाचित्रकारही होता. पत्रकार परिषद संपताच छायाचित्रकारांच्या टोळीने अपेय पानाकडे मोर्चा वळवला. कधी नव्हे इतका मद्याचा अतिरेक केल्यामुळे मंग्याचा तोल सुटला. दारूच्या नशेत त्याने तेथे अक्षरश: धुडगुस घातला. आयोजकांपैकी एका महिलेसोबत गळ्यात हात घालून फोटो काढण्याचा त्याने प्रयत्न केला. तारवटलेल्या डोळ्यांनी केलेल्या असभ्य वर्तनामुळे ती महिला चिडली. तत्काळ तेथे बाऊन्सर्स आले आणि मंग्याची गचांडी पकडून त्याला बाहेर काढण्यात आले. एवढेच नव्हे, तर विनयभंगाच्या या प्रकारामुळे संतापलेल्या त्या महिलेने पोलिसांना पाचारण केले. मग छायाचित्रकारांची वरात पोलीस स्टेशनला गेली. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी चालू केली. पण, अखेर आयोजकांनी व काही पत्रकारांनीच माफी मागून हे प्रकरण मिटवले. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आयोजकांनी स्वतंत्र गाडीतून मंग्याला पत्रकार संघात सोडले. तेथे पोटातील सारे ओकून नव्याको-या संघाची या मंग्याने वाट लावली. तेथून गाडीतून वर्तमानपत्राच्या कार्यालयाजवळ या मंग्याला सोडून आयोजक परतले. या सा-या घटनेची पत्रकार व छायाचित्रकारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मान्ग्याकडून हा काही पहिलाच प्रमाद घडलेला नाही. गेल्याच महिन्यात तरूणीच्या विनयभंग प्रकरणात ग्रामीण पोलीस स्टेशनची तीन दिवस हवा खाऊनही मंग्या सुधारलेला नाही अशीच चर्चा आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि महाराष्ट्रभरातील पत्रकारांमध्ये मंग्याचाच्या या दाऊ पिऊन केलेल्या धिंगाण्याची चर्चा सुरू आहे.