निखिल वागळे जय महाराष्ट्रच्या वाटेवर...

मुंबई - मराठी मिडीयात दिवाळीनंतर फटाके फुटणार,हे बेरक्याचे भाकीत खरे ठरणार आहे.आय.बी.एन.-लोकमत सोडल्यानंतर अस्थिर असलेले निखिल वागळे स्थिर होण्यासाठी आता जय महाराष्ट्र चॅनल जॉईन करणार असल्याची पक्की खबर बेरक्याच्या हाती लागली आहे.वागळे यांनी मालक सुधाकर शेट्टी यांना काही अटी घातल्या असून,त्या अटी शेट्टींनी मान्य करताच,वागळे आणि त्यांचे आठ समर्थक जय महाराष्ट्र जॉईन करणार असल्याचे कळते.
आय.बी.एन.- लोकमत सोडल्यानंतर निखिल वागळे केवळ प्रवाहात राहण्यासाठी मी मराठीमध्ये सल्लागार संपादक म्हणून काम करीत आहेत.मात्र मी मराठीची सर्व सुत्रे रविंद्र आंबेकर यांच्या हातात असल्यामुळे वागळेंना काम करण्यास वाव मिळत नाही.त्यामुळे वागळे दुस-या मराठी चॅनलच्या शोधात होते.
अखेर वागळे यांना जय महाराष्ट्र चॅनलच्या मालकाकडून निमंत्रण आले असून,वागळे आणि मालक सुधाकर शेट्टी यांच्यात एक मिटींगही झाली आहे.मात्र त्यात वागळेंनी काही अटी घातल्या आहेत.पहिली अट आय.बी.एन- लोकमतसारखे पॅकेज आणि दुसरी अट म्हणजे त्यांचे आयबीएन - लोकमतमध्ये असलेले आठ समर्थक सोबत असतील,तसेच जय महाराष्ट्रमध्ये वागळेंच्या मतानुसार सर्व फेरबदल आणि तांत्रिक दुरूस्त्या केल्या जाव्यात,अशीही अट घालण्यात आल्याचे कळते.
मालक शेट्टी यांनी वागळेंच्या सर्व अटी मान्य केल्यास वागळे आणि त्यांचे आठ समर्थक लवकरच जय महाराष्ट्रमध्ये दिसतील.दरम्यान वागळे येणार असल्याची कुणकुण लागताच जय महाराष्ट्रची जुनी टीम चांगलीच हादरली आहे.