सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोणत्या तरी उमेदवाराकडून
गोंदीयाच्या बीजेपी माझा चॅनलच्या रिपोर्टरने पैसे घेतले होते.त्याची
व्हिडीओ क्लीप आणि फोटो पुर्वीच्या रिपोर्टरने काढून चॅनलच्या
व्यवस्थापनाकडे पाठवली...मात्र कारवाई होत नव्हती.नंतर त्याने संबंधितास दम
दिला की, त्याला काढा नाही तर बेरक्याला आपल्या रिर्पाटरने पैसे घेतलेली
बातमी,फोटो आणि व्हिडीओ क्लीप पाठवतो.नंतर काय आश्यर्च त्या रिपोर्टरला आज
तातडीने नारळ देण्यात आला.
च्या मारी ...माहित नव्हते बेरक्याची चॅनलवाले सुध्दा इतकी धास्ती घेतात...
मिळालेल्या माहितीनुसार हा विदर्भ ब्युरोचा पंटर होता.त्याने स्वत:ही भरपूर पैसे कमावले त्याहीपेक्षा ब्युरोला मिळवून दिले आहेत.पण व्यवस्थापनाने बिचाऱ्या एकाट्यालाच बळीचा बकरा केला.तो मात्र नामानिराळा आहे.
ही व्हिडीओ क्लीप आणि फोटो तो रिपोर्टर अजूनही बेरक्याकडे पाठवला नाही.मात्र बेरक्याचा नावाचा वापर मात्र केला.आता बोंबला...
गोंदीयाचा प्रकार कसा उघडकीस आला ?
विदर्भातील गोंदीयामध्ये चॅनलच्या पत्रकारांमध्ये दोन गट आहेत.एका गटाने एका उमेदवारांकडून दोन लाखाची मागणी केली होती.पैकी त्या उमेदवारांने एक लाख रूपये दिले होते.मात्र ज्याच्या हातात रक्कम पडली त्याने उमेदवाराने पन्नास हजार रूपये दिल्याचे सांगितले.त्यानंतर दुस-याने खात्री केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.नंतर त्यांच्यातच भांडण पेटले.चोरीचा माल वाटण्यावरून झालेल्या भांडणाचे रूंपातर चोरी उघडकीस येण्यात झाले आहे.