देवेंद्रपर्व सुरू होताच नागपूरच्या पत्रकारांची दुकानदारी सुरू

नागपूरचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले,याचा सर्वाधिक आनंद नागपूरच्या पत्रकारांना झाला आहे.मुख्यमंत्र्यासोबतचे जुने फोटो काढून ते फेसबुकवर अपलोड केले जात आहेत.अश्या किती पत्रकारांना मुख्यमंत्री ओळखतात,हा भाग वेगळा परंतु गेल्या काही दिवसांपासून विपरीत ऐकावयास मिळत आहे.
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसंपर्क दांडगा होता,यात शंका नाही.त्यांचे पत्रकाराबरोबरचे संबंधही मित्रत्वाचे होते,मात्र मुख्यमंत्र्यासोबत जुने संबंध असलेल्या काही पत्रकारांनी आता दुकानदारी सुरू केली आहे.मुख्यमंत्र्यासोबत आपले थेट संबंध असून,आपले काही काम असेल तर सांगा,असे ते लोेकांना सांगू लागले आहेत.मुंबईत दुकानदारी करणारे पत्रकार आणि नागपूरात दुकानदारी करणा-या पत्रकारांंचे सूत जमले असून,ते आता जनतेला टोप्या घालण्याचे काम करू शकतात.अश्या पत्रकारांपासून मुख्यमंत्र्यांनी दूर राहण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर दौरा करून अनेक ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या आहेत.यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांच्यासोबत फोटो काढले आहेत.यात नाविण्य काहीच नाही. आमदार असताना फडणवीस यांचे फोटो अनेक पत्रकारांजवळ असू शकतात.याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांना ओळखतात,असे नव्हे.
पत्रकार मुख्यमंत्र्यांना ओळखणारे असले तरी,मुख्यमंत्री किती पत्रकारांना ओळखतात,हा प्रश्नच आहे.
मुख्यमंत्र्यासोबत आपले संबंध आहेत,असे सांगून जर कोणी जनतेला गंडवत असेल तर बेरक्याला थेट berkya2011@gmail.com मेल करा...अश्या पत्रकारांना उघडे करण्याची जबाबदारी बेरक्याची राहील.