ठाण्यातील जनादेश, जनमुद्रा आणि नवाकाळ या दैनिकांसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डावखरे यांनी सन्मानने
हाकलपट्टी केलेला एक पत्रकार शिवसेनेच्या आश्रयाने सध्या
विधानभवनात दाखल झाला आहे. विरोधी पक्षनेत्यांचा खाजगी स्विय सहाय्यक
असल्याचे तो सांगतो आहे.
याच महाशयाने यापुर्वी मंत्रालयात दोन
प्रतिष्ठीत दैनिकाच्या पत्रकारांना हाताशी धरून महसूल खात्यातील दोन
अधिकारी आपले नातेवाईक आहेत असे सांगून बदल्या करून घेतल्या व त्याचे
लाखो रूपये परस्पर हडप केले. हा पत्रकार ठाण्यातून गेला याचा आनंद
साजरा करण्यासाठी ठाण्यातील प्रेसरूमध्ये काही पत्रकारांनी पेढे वाटून
आनंद साजरा केल्याचेही वृत्त आहे. ठाण्यातील पत्रकारांचे लोंढे आता विधानभवनात वावरू लागल्यामुळे अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे…