आकाशवाणी औरंगाबाद केंद्रामध्ये पत्रकारितेची संधी


आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात एक वर्षाच्या करार तत्वावर वृत्तसंपादक आणि वृत्तनिवेदक तथा भाषांतरकाराची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वृत्तसंपादक पदासाठी उमेदवार पत्रकारितेतील पदविकाधारक असावा. त्याला जनसंवाद, रेडिओ, दूरचित्रवाणीमध्ये पत्रकारीतेचा अनुभव असावा. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना प्रतिमाह २५ हजार रूपये एकत्रित मोबदला दिला जाईल.
वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार पदासाठी इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी तसंच पदवीला मराठी विषय अनिवार्य असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना आवाजाची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना प्रतिमाह २३ हजार रूपये मोबदला दिला जाईल.
या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचं वय दि. १ जानेवारी २०१५ रोजी २१ ते ५० वर्षांदरम्या न असावं. निवड होणाऱ्या उमेदवारांना एकत्रित मोबदल्याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय असणार नाहीत.
इच्छूक उमेदवार या भरतीबाबतची अधिक माहिती आमच्याnewsonair.nic.in/vacancy.asp किंवा newsonair.com/ vaccancy.asp वर पाहू शकतात. अथवा आकाशवाणी औरंगाबाद केंद्राशी देखील संपर्क करू शकतात.
या पदासाठी अर्ज पाठवितांना उमेदवारांनी लिफाफ्यावर ‘वृत्त संपादक किंवा वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार पदासाठी अर्ज’ असे लिहीण्यास विसरू नये. अर्ज पाठविण्याचा पत्ता असा - कार्यालय प्रमुख, आकाशवाणी केंद्र, जालना रोड, औरंगाबाद ४३१००५
पत्ता पुन्हा एकदा ऐका- कार्यालय प्रमुख, आकाशवाणी केंद्र, जालना रोड, औरंगाबाद ४३१००५

निवेदन
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याकरीता लघुलेखक (स्टेनो) आणि डाटा इन्ट्री ऑपरेटर्स पुरविण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थाकडून निविदा मागविण्यात येत आहेत.
दि. २३ डिसेंबर २०१४ दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील, त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता या निविदा उघडण्यात येतील.
अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थांच्याच निविदा स्वीकारण्यात येतील, पात्र संस्थेसोबत औपचारिक करार केला जाईल, याबाबतची अधिक माहिती आमच्याhttp://www.newsonair.nic.in/disptenders.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा इच्छूक संस्था आकाशवाणी केंद्राशी संपर्क साधू शकतात.