''जागृती'' येतोय...

होय,जागृती येतोय...पण वृत्तपत्र नव्हे न्यूज चॅनल येतोय.तेही मराठीत.येत्या १५ दिवसांत हे चॅनल सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.पुण्याच्या एका पॉश एरियामध्ये जागृती चॅनलच्या स्टुडिओचे काम पुर्ण झाले असून,यंत्रसामुग्री बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जागरण ग्रुपचा या चॅनलशी कसलाही संबंध नाही.पुण्याच्या एका उद्योगपतीचे हे चॅनल आहे.पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये मारीगोल्ड बिल्डींगमध्ये या चॅनलचे स्टुडिओ आहे.मुंबईत ब्युरो ऑफीस करण्यात आले आहे.
प्रिंट मीडियात अनेक वर्षे काम केलेले संजीव शाळगावकर हे चॅनलचे संपादक आहेत.सहारा,मुंबईची जुनी टीम या चॅनलमध्ये जॉईन झाली असून,राज्यात अनेक ठिकाणी रिपोर्टर नेमण्यात आले आहेत.मंगळवारी सर्व रिपोर्टरची बैठक पार पडल्याचे एका रिपोर्टरने कळविले आहे.येत्या दहा दिवसांत काम पुर्ण करा,असा आदेश मालकाने दिला आहे.खरे तर हे चॅनल दिवाळीपुर्वीच सुरू होणार होते,पण यंत्रसामुग्री वेळेत न आल्यामुळे चॅनलचे लॉचिंग लांबणीवर पडले आहे.राज्यातील अनेक केबल ऑपरेटरशी या चॅनलने करार केला असून,डिश टीव्हीवर प्रक्षेपण होणार असल्याचेही हा रिपोटरने कळविले आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.