'झा'शाहीला भास्करचे कर्मचारी वैतागले

औरंगाबाद - 'केवळ नाव सोनुबाई, आणि हाती कथलाचा वाळा' अशी अवस्था दैनिक भास्करच्या औरंगाबाद आवृत्तीची झाली आहे.युनिट हेड एस.के.झा यांच्या मनमानी आणि जाचक कारभारामुळे भास्करचे कर्मचारी वैतागून गेले आहेत.अनेक जिल्हा प्रतिनिधी याच कारभारामुळे सोडून गेल्याची माहिती बेरक्याकडे आली आहे.
औरंगाबादची भास्करची रिपोर्टर उज्वला साळुंके यांची व्यथा बेरक्याने मांडल्यानंतर बेरक्याकडे आता झाशाहीच्या नव्या -नव्या तक्रारी येत आहेत.निवासी संपादक अब्दुल कदिर असताना,त्याना न विचारता,किंवा कसलीही कल्पना न देता 'झा'ने संपादकीय विभागात भर्ती सुरू केली आहे.त्यामुळे कदिर हे केवळ नावाला निवासी संपादक आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
'झा'ने काही दिवसांपुर्वी नगर,परभणीसह अनेक जिल्हा प्रतिनिधींना कसलीही पुर्वसूचना न देता अचानक कामावरून कमी केले.औरंगाबादला भास्कर सुरू होवून चार वर्षे पुर्ण होत आली तरी केवळ जिल्हा प्रतिनिंधीला सहा हजार रूपये मानधन देण्यात येत होते.त्याचबरोबर त्यांचे मानधन झा जाणीवपुर्वक अडवून ठेवत असत.औरंगाबाद भास्करचे हेड ऑफीस नागपूर आहे.नागपूरहून जरी चेक आले तरी झा जाणीवपुर्वक त्यांच्या खात्यावर जमा करीत नव्हते.त्यामुळे मराठवाडासह नगर,नाशिक आणि खान्देशचे जिल्हा प्रतिनिधी 'झा'शाहीला वैतागून गेली आहेत.
संपादकीय तसेच अन्य विभागातील कर्मचा-यांना अत्यंत तोकडा पगार दिला जातो.दुसरीकडे काम मिळत नाही म्हणून काही जण वैतागून काम करीत आहेत.मात्र नवी संधी मिळताच ते निघून जात आहेत.त्यामुळे भास्करला सातत्याने गळती सुरू आहे.
वास्तविक औरंगाबाद दैनिक भास्कर आणि दिव्य मराठीचा कसलाही संबंध नाही.दोघांचे मालक वेगळे,ऑफीस वेगळे आहे.एवढेच काय प्रिंटींग मशिन सुध्दा वेगळी आहे.दैनिक भास्करचे मालक मनमोहनसिंह अग्रवाल आहेत.ते जबलपूरला राहतात.दिव्य मराठीचे मालक रमेशचंद्र अग्रवाल असून,ते भोपाळला राहतात.मात्र ऐकमेकांचा संबंध सांगून वाचकांची दिशाभूल केली जात आहे.
दैनिक भास्करच्या औरंगाबाद आवृत्तीचा खप अगोदरपासून जेमतेम होता.आता झा शाहीमुळे चांगलाच ढासळला आहे.बिझीनेसपण फारच कमी असल्यामुळे औरंगाबाद आवृत्ती तोट्यात सुरू आहे.जोपर्यंत 'झा'च्या हातात मालक सोटा देत नाही,तोपर्यंत औरंगाबाद आवृत्तीची आणखी वाटच लागणार आहे.

जाता - जाता
................
दैनिक गावकरीला लाखो रूपयाचा चुना लावून मराठवाड्यातील उस्मानाबादचा एक 'गावकरी रेडा' भास्करमध्ये दाखल झालेला आहे.तो स्वत:ला साईभक्त समजतो,मात्र त्याच साईबाबाच्या साक्षीने दररोज मदिरा ढोसत असतो.त्याने गावकरीला कसा चुना लावला याची सर्व स्टोरी बेरक्याकडे आली आहे.अशा बदमाशाला झाने आश्रय दिला आहे.त्याला गावकरीतून आलेल्या एका जाहिरात विभागातील बदमाशाची 'शेलकी' साथ मिळाली आहे.चोराला मेसाई धारण झाला आहे.
..............................................

दैनिक 'भास्कर'च्या औरंगाबाद आवृत्तीत 'छमकछलों'ना आले महत्व...
काय आहे नेमकी भानगड ?
वाचा उद्या म्हणजे बुधवारी...
तेही फक्त बेरक्यावर...