होय बेरक्याची न्यूजच खरी आहे ...

शेतकरी व्यथा मांडताना अतीव दुःखाने ऑन कॅमेरा अश्रू ढाळणारी जगाने पाहिलेली निवेदीका आता 'जग जिंकायला निघालेल्या' टीममध्ये नसेल. तिला नारळ देण्यात आलाय. वस्तुत: या बाईने स्वत: बुलेटीन व्यवस्थित एडिट करण्यात कुचराई केली; ज्युनियर प्रोड्यूसरच्या भरवशावर आपली जबाबदारी ढकलली। बुलेटीन सुरु होताच नको ते अनएडिटेड व्हीजुअल्स ऑन एअर होताच तिचे धाबे दणाणले. काय करायचे काहीच सुचले नाही; आता आपले काय होणार या भीतीने धास्तावून तिने चालू बुलेटीन सोडून पळ काढला. बुलेटीन सुरु आणि सेटवर निवेदक कुणीच नाही; या अराजक स्थितीने काही काळ गोंधळ माजला. मग प्रसंगावधान दाखवून राजेंद्र हुंजे यांनी परिस्थिति सांभाळली. या चलाख; बनेल निवेदीकेने थोड़े सावरताच; शेतकऱ्यांच्या दुःखाच्या बातम्या सांगताना तिला कशा वेदना झाल्या; रडू कोसळले व तिने कसे चालू बुलेटीन सोडले याची रसभरीत कथा 'व्हॉट्स-अप'वर महाराष्ट्रभर पसरविली!!
 
जाता जाता
भविष्याचा वेध घेणाऱ्या एका वर्तमानपत्रातील राजकीय संपादक लवकरच 'पुढारी' होणार! [तसे ते पुढारी आहेतच की! भगवान करो त्यांचा पत्रकारितेचा गड शाबूत राहो अन नव्या ठिकाणी सिंहासारखे (सारसबागेतील सिंहासारखे नव्हे; तर कोल्हापूरच्या) प्रताप घड़ोत.