अरे किती हा भंपकपणा ...म्हणे 'चला जग जिंकू' या ...

मित्रानो,चला जग जिंकू या चॅनलमधील एका महिला पत्रकार आणि अँकरला शेतकऱ्यांचे दु:ख पाहून रडू आल्याची पोस्ट सध्या फेसबुक आणि व्हॉटस अॅपवर फिरत आहे.पण खरी वस्तुस्थिती काय आहे,हे बेरक्याने जाणून घेतले असता वेगळीच भानगड कळली आहे.
.........................
'चला जग जिंकू' या चॅनलमधील एका महिला पत्रकार आणि अँकर … …. यांना सलाम.
आज दिं.13-12-2014 च्या रात्रीच्या 8 वाजेच्या गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या नुकसानीचे विशेष बातमीपत्र …. सादर करत होत्या.
शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान पाहुन;शेतकर्यांच्या व्यथा पाहुन …. डोळे पान्हावले आणि बोलतांनाही कंठ दाटुन आला.
अखेर …. ना बातमीपत्र सादर करता आले नाही.त्यांच्या जागेवर राजेंद्र हुंजे यांना येऊन बातमीपत्र पुर्ण करावे लागले.
शेतकर्यांच्या साठी अश्रू डाळणार्या संवेदनशिल … यांना सलाम.
वगॆरे वगॆरे …।
शेतकरी असाल तर हा फॉरवड करा नाही तर बांगड्या भरा….
……………………………….
असा एक Message गेले काही दिवस Whats app आणि face book वर फिरतो आहे.
परंतू असं काही घडलं नाही
घटना अशी झाली कि,
'चला जग जिंकू' या चॅनलमधील एका महिला पत्रकार आणि अँकरला ज्या व्हीजवल्सने ते बुलेटीन ओपन करायचं होतं ते व्हीजवल्स लाऊन घेण्याची जबाबदारी तिची असताना तिने ते दुसऱ्याला सांगितले आणि त्या व्यक्तीने हे एकदा पाहुण घे असं म्हंटल्यानंतर तिने ते व्यवस्थित न पहाता ठिक आहे असं म्हंटलं.....आणि प्रत्यक्षात जेव्हा व्हीजवल्स ऑन एअर गेले तेव्हा मला या व्हीजवल्सने बुलेटीन ओपन करायचं नव्हत हि सर्व प्रोडक्शनची चुकी आहे. असं म्हंणत बाईंनी डोळ्यात पाणी काढलं आणि कोणाला ही काहीही न सांगता बाईंनी चालु बुलेटीनमध्ये ब्रेक झाल्यानंतर पळ काढला....
थोडावेळ कोेणी अँकर नाही म्हणुन तारांबळ उडाली आणि वेळेवर राजेंद्र हुंजे जाऊन बसले.....
आता हि खरी वस्तुस्थिती असताना वरील मॅसेज तिच्याकडूनच फिरवले जात आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे तिने हे कृत्य केल्यामुळे तिची दांडी उडाली आहे....
मनमानी केल्याबद्दल तिला राजीनामा द्यायला सांगितला आहे....