बेरक्याच्या वृत्ताला भास्करची पृष्टी

दैनिक भास्करच्या औरंगाबाद युनीटला एका जाहिरात प्रतिनिधीने लाखो रूपयाचा चुना लावल्याचे वृत्त बेरक्याने काही दिवसांपुर्वी प्रसिध्द केले होते.आता दैनिक भास्करनेच या वृत्ताला पृष्टी दिली आहे.
शिवाजी काकडे असे या जाहिरात प्रतिनिधीचे नाव आहे.त्याने भास्करला लाखो रूपयाचा चुना लावला आहे.याबाबतचे वृत्त बेरक्याने काही दिवसांपुर्वी प्रसिध्द केले होते.त्यानंतर नागपूरचे जनरल मँनेजर सतिश रांका यांनी औरंगाबाद युनिटला भेट दिली.मात्र ज्यांच्या कृपेमुळे हा अपहार झाला आहे,ते स्वयंघोषित संपादक आणि युनिट हेड यांना मात्र त्यांनी जीवदान दिले की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
काकडे हाच बदमाश आहे,असे सांगत दैनिक भास्करने आज सावधानतेची जाहिरात प्रकाशित केले आहे.नेमकी काय आहे,ही जाहिरात पहा...