माझी
चाटूगिरी करा. मी पदावर असे पर्यंत विरोधात बातम्याबाजी करू नका. मला काही
कळत नसले तरी माझा उदोउदो करा. असे करणाऱ्या पत्रकाराला फॉरेन ट्रिप आणि
दरवर्षी पाच पत्रकारांना घरं देण्याची ऑफर एका मंत्र्याने अमरावतीच्या पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे या मंत्र्याची
चाटूगिरी करण्यासाठी अमरावतीचे अनेक पत्रकार सरसावले आहेत .
मूळात हे मंत्री बिल्डर आहेत. त्यांची इंजिनीयरिंग, मॅनेजमेंट, पॉलिटेक्निक अशी अनेक कॉलेजेस आहेत. बिल्डर मधून मंत्री पदाच्या काळात या मंत्र्याला आपल्या टाऊनशीप साठी आऊट ऑफ द वे जाऊन नकाशे आदी मंजूर करून घ्यायचे आहेत. इतकेच नव्हे तर मंत्री म्हणूनही एमआयडीसी आदी उद्योगांमध्ये फायदा करून घ्यायचा आहे.
हे मंत्री आधीपासूनच करोडपती आहेत. लक्ष्मी बळाच्या जारोवरच त्यांनी स्थािनक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढवली व विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून केले. गडगंज पैसा असल्यानेच त्यांची मंत्री मंडळात वर्णी लागली. मंत्री होण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष आधीपासून फिल्डिंग लाऊन ठेवली होती. आता मंत्री झाल्यानंतर करोडपती वरून अरबपती कसे होता येईल, याचे प्लानिंग हे मंत्री करीत आहेत
त्याला पत्रकारांची साथ मिळणे गरजेचे आहे. विरोधात बातम्या छापून आल्या नाहीत तर चौकशी, तक्रारी आदी भानगडी होणार नाही म्हणून हे मंत्री पत्रकारांना फॉरेन ट्रिपची खुली ऑफर एका पत्रकार परिषदेत दिली. इतकेच नव्हे तर पत्रकार परिषद आटोपल्यानंतर त्यांनी घरांचीही ऑफर दिली. दरवर्षी पाच पत्रकारांना घर देण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. या मंत्र्याच्या सकारात्मक प्रसिद्धीच्या लिस्ट मध्ये काही खास पेपर आहेत. त्यात लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी यांचा समावेश आहे.
अमरावतीच्या तपोवन लैंगिक छळ प्रकरणी अतिउत्साहाच्या भरात बातम्या छापल्याने लाेकमतचा जिल्हा प्रतिनिधी गणेश देशमुख याच्या विरूद्ध बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची ओळख नाव, गाव, पत्त्यासह उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा खर तर अजामिनपात्र आहे. परंतु देशमुखने मंत्र्यापुढे असे काही लोटांगण घातले की पोलिसांनी समोर असलेल्या गणेशला अटक करणे टाळले. आता या गणेशने कोर्टातून अंतरिम जामिनही मिळवला आहे. गणेश वरील या उपकरामुळे या मंत्र्याचे लोकमत मधील काम फत्ते झाले आहे. त्यामुळे या मंत्र्याच्या विरोधात लोकमतला बातम्या येण्याचा प्रश्नच नाही.
आता उरला प्रश्न दिव्य मराठीचा तर तेथील एक चाटू पत्रकार सध्या हे मंत्री कसे ग्रेट आहेत याचे गुणगान अख्ख्या गावात गात आहे. त्यामागे ट्रिप व घर हाच उद्देश नाही तर त्यापुढे दोन पावले जाऊन दूरगामी लाभाच्या योजना आहेत. त्याचे पुढच्या पाच वर्षाचे प्लानिंगच त्याने केले आहे.
कमी खप असलेल्या पण स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या हिंदूस्थान, जनमाध्यम, लोकशाही वार्ता, अमरावती मंडल, वृत्त केसरी, प्रतिनिधी अखबार आणि हिंदी भास्करची काळजी घेण्याची ग्वाही या मंत्र्यानि दिली आहे. त्यामुळे या दैनिकांना आपल्या बाजूने वळवण्याची मोहिमही यांनी फत्ते केली आहे. परंतु यापेक्षाही लोकमत, दिव्य मराठी, आणि पुण्यनगरी या तीन प्रमुख पेपर मध्ये आपल्या जास्तीत जास्त चांगल्या, कौतूक करणाऱ्या बातम्या छापून आणण्याचे या मंत्र्याचे मुख्य टार्गेट आहे.