मी मराठी लाईव्ह लवकरच पुण्यात

पुणे - मुंबईनंतर मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्राची दुसरी आवृत्ती पुणे येथून लवकरच सुरु होत आहे. त्यासाठी संपादक माचकर यांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस शंकरशेठ रोडवरील वेगा सेंटर या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात या मुलाखती पार पडल्या.  पुढील आठवड्यात आणखी काही जणांच्या मुलाखती पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीत एक-दोन सिनिअर सोडले तर बहुतांश प्रशिक्षणार्थी व शिकाऊ उमेदवारांनीच हजेरी लावली.
मुंबई येथून प्रकाशित होणारे मी मराठी लाईव्ह या वृत्ताचा अंक सेम टू सेम मटाचाच कॉपी वाटतो. पुण्यात जेव्हा सकाळ, लोकमत अन् पुढारीची चलती असताना महाराष्ट्र टाईम्स हा पूर्णपणे अपयशी ठरला. पुणेकरांनी मटाला स्वीकारले नाही. मुळात तेथे नवीन प्रयोग करायला काही संधी नसतानाच निवासी संपादक पराग करंदीकरदेखील काही चुणूक दाखवू शकले नाहीत.  त्यात मुंबईतीलच मटाची कॉपी असलेला अंक मी मराठी लाईव्हचे संपादक माचकर पुण्यात देतील, की सकाळ, लोकमत, पुढारीसारखे काही नवे प्रयोग करून पुणेकरांना आपलेसे करतील, याबाबत उत्सुकता आहे. पुण्याबाहेरील काही प्रयोगशील लोकांना आवर्जुन सोबत घेण्याची भूमिका माचकर यांनी घेतली असल्याचे दिसत असले तरी पुण्यातील ज्येष्ठांना हेरण्याचे कामदेखील त्यांच्याकडून सुरु असल्याचे कळते. साधारणतः मेपूर्वी हे वृत्तपत्र पुण्यात पदार्पण करेल, असा अंदाज आहे.