नगर अपडेट ...


नगर पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक रामदास ढमाले येत्या मेपासून स्वतःचे दैनिक सुरु करणार आहेत . पुण्यनगरीचे एक निवासी संपादक, देशदूतचे एक माजी कार्यकारी संपादक यांच्यासह स्थानिक चांगल्या पत्रकारांची टीम सोबत घेऊन हे दैनिक बाजारपेठेत येणार आहे.

नगर उत्तर जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक असलेल्या सार्वमतला अद्यापही दक्षिणेत पाय रोवता आले नाहीत. त्यामुळे आता हे दैनिक दक्षिणेत स्वतंत्र आवृत्ती काढत आहे. एकाच जिल्ह्यात या दैनिकाच्या प्रती दोन वेगवेगळ्या किमतीत विकल्या जात आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासून सार्वमत आता स्वतःच्या जागेत बोल्हेगाव एमआयडीसी येथे जाणार असून, त्यामुळे कमी पगारात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.  दक्षिणेत जम बसविण्यासाठी चांगल्या निवासी संपादकाचा संपादक नंदकुमार सोनार यांच्याकडून शोध सुरु आहे.