
'मटा'चे जळगावातील संपादकीय प्रमुख हे उपरे असून बाहेरगावहून (मनमाड)
रेल्वेने अप-डाउन करतात तर महत्त्वाचा भाग असलेले क्राईम रिपोर्टर हेही
बाहेरगावचेच(अमळनेर)! संपादकीय प्रमुखांची सारी शक्ती ही ये-जा करण्यातच
वाया जाते. त्यात घरी लवकर परतायचे म्हणून त्यांची नोकरी ही जणू सरकारी
नोकरीच!! 11 ते 7!!! सातच्या आत रेल्वे स्टेशन!! त्यात सागवान घोटाळा,
घरकुल घोटाळा, पालिका घोटाळा अशा सर्व शहरातील वाचकांच्या मागणीचा भाग
असलेल्या बातम्यात 'जैन'नगरीबाहेरचे (जळगावला 'जैन'नगरीही गमतीने म्हटले
जाते!) प्रमुख कमी पडतात. या बातम्या 'मटा'त अगदी किरकोळ पद्धतीने छापून
येतात. त्यात ही 'सेटिंग' वाचकांना काही पसंद पडत नाही. (सेटिंग म्हणजे
ले-आऊट व रचना; गैरसमज नको!) 'मटा'चे निवासी संपादक हे जळगावचे जावई
असूनही या दैनिकाला स्थानिक चेहरा-मोहरा मिळता मिळत नाहीये!!
अलीकडे तर चक्क इतर वर्तमानपत्रात आदल्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या
बातम्या 'मटा'मध्ये नंतर प्रसिद्ध होतात!! ठीक आहे कदाचित डेडलाईन लवकर
असेल रात्री दहाची ... पण आदल्या दिवशी इतर वृतपत्रांनी आतील पानात छापलेली
बातमी 'मटा' दुसऱ्या दिवशी चक्क स्पेशल एंकर म्हणून छापतेय ...
जावईबुवा, पाहा जरा... आणि हे 'अपडाऊन' जरा थांबवा... तिकडे
'भास्कर'वाल्यांचा नियम आहे; ज्या ठिकाणी नोकरीचे स्थान असेल त्याच
मुख्यालयी घर, अप-डाउन वैगेरे असेल तर त्यांचे 'शटर डाउन'!! कशी कराल बाबा
स्पर्धा??
मूळ 'सकाळ'ची बातमी : १९ मार्च - http://epaper.esakal.com/ sakal/19Mar2015/Enlarge/ Jalgaon/JalgaonToday/page4.htm
'मटा'ने केलेली कॉपी : २० मार्च - http://epaperbeta. timesofindia.com/index.aspx? EID=31831&dt=20150320