मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील घाटकोपर येथील एका रुग्णालयाची
दुरावस्था दाखवली म्हणून तेथील नगर सेवक जो स्वतःला साई भक्त म्हणवतो आणि
यावरच निवडून आला आहे) यांनी दोन पत्रकारांना प्रशांत बढे ( मुंबई सकाळ )
प्रशांत अंकुशराव ( झी २४ तास ) शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली
यावर पत्रकारांनी पोलिसात तक्रार करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला ,
तर पिसाळलेल्या नगरसेवकाने आपल्या कार्यकर्त्याला आणि त्याच्या पत्नीला या
दोन्ही पत्रकारान विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली
( एक मंत्री आणि एक शिक्षक आमदार यांच्या दबाव तंत्रामुळे ) आणि कळस
म्हणजे आपल्या कार्याकार्यान मार्फत फेसबुक आणि व्होट्स अप वर बदनामी करून
घाणेरडे राजकारण करीत पत्रकारितेचा अपमान केला आहे , आज ह्या दोन
पत्रकारांवर असे घाणेरडे आरोप करण्यात आले उद्या असेच आरोप कोणत्याही
निष्पाप पत्रकारावर होऊ शकतात त्यामुळे खरच पत्रकारिता धोक्यात आली आहे असा
प्रश्न निर्माण होत आहे .या प्रकारचे प्रेस क्लब मुंबई , टी व्ही जे ए ,
आणि बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन याच्या काढून निषेध व्यक्त करण्यात
आला आहे ,