नांदेड येथील समाजकल्याण आयुक्तांनी पत्रकारांना वाटले पाकीटे ?


नांदेड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत शुक्रवार 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आल होते. यामध्ये जिल्ह्यातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होतीे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे आयोजित या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह समाजकल्याण सहा. आयुक्त सतेंद्र आऊलवार, सामाजिक कार्यकर्ते बालाजी कोम्पलवार यांच्यासह समाजकल्याण विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरवातीलाच उपस्थित पत्रकारांची नावे नोंदवून त्यांच्या नावाने पाकीटे तयार केली गेली. कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात सहाय्यक आयुक्तांनी सर्व पत्रकारांना गुलाबाच्या फुलासोबत एकेक पाकीट भेट म्हणून दिले. पाकीटात 1000 रूपये प्रत्येक पत्रकाराला मिळाले. बहुतांश पत्रकारांनी कार्यालयात या पाकीटाचे बिंग फुटू दिलेच नाही.