'पुण्यनगरी'त बदलांचे वारे!

 लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे हिशेब बहुतांश वृत्तपत्रांनी पूर्ण केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात डझनभर संपादक व व्यवस्थापक निवडणूक घोळामुळे घरी गेले आहेत. पुण्यात पद्मश्रींच्या पेपरच्या संपादकाला बुधवाराचा रस्ता धरावा लागला; त्यांचा नाशकातल्या पंटरची नसबंदी केली गेलीय आणि सहमिजासी 'रंगीला औरंगाबादी'चीही घटिका भरत आलीय.
बुधवाराचे मुंबईतील दोघे संपादक गळपटले आणि बेळगाववाल्यांच्या दादरनिवासिनी कार्यकारीलाही रामराम केला गेलाय. निवडणूक हिशेबातील अफरातफरीचे गंडांतर आता 'पुण्यनगरी'तील अनेकांवर येणार आहे. पहिल्या टप्प्यात जळगावातील व्यवस्थापक देवेंद्र करकरे यांना प्रेमाचा निरोप देण्यात आलाय. त्यांना निवडणूक धामधुमीत नव्या फ्लॅटची खरेदी भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्याच बरोबर कार खरेदी करणाऱ्याची 'दादा'गिरीही लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जातेय. मामा संकटात आणि तिकडे भांजाही 'दिव्य' संकटात असल्याची चर्चा आहे.
चोपड्यातील वार्ताहराने चोपड्यातील देवाण-'घेवाण'बाबत भांज्याची तक्रार केल्याचे समजते. अमळनेरातील मुलीच्या यशाची बातमी 3-4 आठवडे दडपून ठेवल्याचे खापरही भांज्याच्या माथी फोडले जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी डुप्लीकेट उपग्रह कामाला लागले आहेत. उपग्रहाच्या देवगिरीनगरीत परशुरामाचा अंश असलेल्या तीन वरिष्ठ संपादकांच्या 'दिव्य' अभद्र युतीने जालनारोडवरील पब्लिक जाम वैतागले आहे.
चिकनाचोपडा बम्बईया-फदया फदफदे-उपग्रह युतीच्या लाजिरवाण्या जातीयवादाने क्रांतीनगरीच्या पुरोगामित्त्वाचा इतिहास कलंकित करून ठेवलाय. या अभद्र युतीला देशमुखी साधन सापडलेय. तीन तिघाडात हा देशमुखी बिघाडा!! देवगिरीतून पुन्हा 'दादा'नगरीत - इथे ज्ञानेश्वर भाले या नवख्याला व 'जोशीं'च्या सचिनला तगड़ा पगार दिल्याने इतके दिवस कमी पैशात घासणारे 'शिंदें'चे कैलास या विचारानेच रोजची 'सकाळ' चिंतेत घालवत आहेत. ते स्वगृही 'देशदूत'ला परततील किंवा 'पुण्यनगरी'चा पर्यायही आहेच! 'पुण्य' व 'तभा'च्या काही बीटसमधील वार्ताहरांच्या आलटी-पलटीची शक्यता आहे.