भाऊ तोरसेकर यांच्या नजरेतून सोलापुरी ओबामा उर्फ सोलापुरी रंगीला ...

पादर्‍याला आवट्याचे निमीत्त 

 माझ्या पत्रकारितेची सुरूवात दैनिक ‘मराठा’त झाली. तिथे आचार्य अत्र्यांच्या सहवासाने भाषेवर प्रभूत्व असलेल्या लोकांची मांदियाळी होती. त्यात दत्तू आंबेरकर ह्या जाहिरात खात्यात काम करणार्‍या छायाचित्रकाराचाही समावेश होता. अधूनमधून नव्या पत्रकार बुद्धीमंतामुळे दत्तोबाची आठवण येत असते. कारण त्यांनी अशा अर्धवटरावांचे नेमके विश्लेषण वा व्याख्या सांगितली होती. सोशल मीडियावर ‘सकाळ’चे रोविंग एडीटर संजय आवटे यांनी लिहीलेल्या एका चिरकुट मजकुरामुफे दत्तू आंबेरकर आठवले. ते अशा अर्धवटरावांना  नव्याने शेंबुड खायला शिकणारा कावळा म्हणायचे. अतिशय किळसवाणा असा तो प्रकार आहे. आरंभी मला त्याचा अर्थ माहिती नव्हता. दत्तोबांशी चर्चा केल्यावर त्यांनी प्रत्यक्षच असा कावळा दाखवला. अत्यंत बुळबुळीत असा हा पदार्थ तुम्ही फ़ेकला, की कावळा त्यावर झेपावतो. पण तो सहजगत्या त्याच्या चोचीत येत नसतो. मग तो चोचीत ओढून घेण्यासाठी कावळा जी कसरत करतो, ती खरेच कितीतरी केविलवाणी असते. ‘चोरटया भाऊच्या मनात चांदणे!!!’ या शिर्षकाचा जो मजकूर आवटे यांनी सोशल मीडियात टाकला, त्यावर नजर टाकली तर दत्तू आंबेरकरच्या शब्दांची प्रचिती येते. 

पुढे वाचण्यासाठी क्लीक करा....

पादर्‍याला आवट्याचे निमीत्त 

....................

 

त्यांच्या खांद्यावर डोकेच नाही मग.....

समर खडस वा आवटे वा त्यांच्यासारखे डाव्या विचारांचे पुरस्कर्ते वास्तवात त्याच विचारसरणी वा चळवळीचे खरे मारेकरी असतात. कारण ते आपले ‘इमान’ उजव्या विचारांनी चालणार्‍या भांडवलदारांच्या ‘दारी’ बांधून समर्थाघरीचे श्वान होतात. त्यांनी येणार्‍या जाणार्‍याला भुंकून भुंकून आपल्या गळ्यातला पट्टा लपवण्यात धन्यता मानली तर नवल नाही.
कुठल्या मोठ्या प्रस्थापित भांडवली गुंतवणूकीच्या माध्यमात डाव्या बुद्धीवादाचे फ़ुटके, गळती लागलेले हौद भरत बसलेल्यांची भामटेगिरी कॉ. पानसरेंनी आपल्या (परिवर्तनाच्या दिशा) पुस्तकातून उघड करताना लिहीले आहे. ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ तमाम मोठ्या माध्यमातून डाव्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या पत्रकार, संपादक व विचारवंतांच्या खांद्यावर त्यांचे स्वत:चे डोके आहे काय? असते, तर त्यापैकी एकाने आपल्या मनासारखे लिहीण्याची हिंमत केली असती. त्यासाठी सोशल माध्यमात येऊन भाऊवर दुगाण्या झाडायची लाचारी त्यांच्यावर कशाला आली असती? गरीबांच्या नावाने गळा काढून गरीबांचाच संघर्ष हे कमकुवत करत असतात. या एका परिच्छेदात त्यांच्या पुरोगामी लढवय्येगिरीचा बुरखाच पानसरेंनी फ़ाडून टाकलाय. मग ते वास्तव लोकांसमोर आणणारा भाऊ तोरसेकर व त्याचा इवला ब्लॉग अशा भामट्यांना खुपत असेल, तर नवल कुठले?

पुढे वाचण्यासाठी क्लीक करा..

 त्यांच्या खांद्यावर डोकेच नाही मग........