सोलापूरच्या DM मध्ये धुसफुस सुरु

सोलापूरच्या दैनिक दिव्य मराठीच्या विभागप्रमुखात धुसफुस सुरु आहे . यूनिट हेड टिंकेश ग्यामलानी आणि निवासी संपादक संजीव पिंपरकर हे दरवर्षी वर्धापन दिनाच्या स्नेह मेळाव्यात एकत्र शुभेच्छा  स्विकारतात.  यावेळी फ़क्त पिंपरकर एकटेच आणि टिंकेश ग्यामलानी यानी वेगवेगळे शुभेच्छा स्विकारताना दिसून आले. टिंकेश ग्यामलानी यांच्याशी फाइनान्सचे राजेश खटके , मानव संसाधनचे कल्याण शेटे आणि वितरणचे संजय जोगीपेटकर यांच्याशिहि ताळमेल नाही. हे सर्व एकमेकांवर कुरगुड्या करण्यातच धन्य मानत आहेत.
टिंकेश ग्यामलानी यांच्या त्रासाला कंटाळून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचार्यानी राजीनामा दिला आहे.त्यामुळे ते  ग्यामलानी आहेत कि ग्यानबाची मेख मारणारे आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे.