हे 'आं - ऊं' कधी थांबणार ?

जग जिंकायला निघालेल्या वाहिनीत सगळेच जण आपापला चेहरा कसा चमकवता येईल यासाठी धडपडतोय. प्रत्येक गट आणि त्या गटाचे म्होरके त्यात आघाडीवर आहेत. 'बेधडक' नावाचा पुचाट कार्यक्रम करणा-या महाशयांना आं, ऊं या शब्दांचा अनेकदा वापर करावा लागतो. मात्र खाज काही सुटत नाही. त्यातच मग ते अनेक नेत्यांच्या मुलाखती घ्यायला जातात तेथेही त्यांचं आं, ऊं सुरूच असते. दुसरे महाशय तर 'एकला चलो रे' करत मिरवत राहतात. फणसाळलेले गटाचे भक्त, त्यांचा हा म्होरक्या जय महाराष्ट्र आणि साममध्ये असतानाही त्यांच्या निष्ठा जपत होता. त्यामुळे त्या भक्तांना त्याचं फळ मिळालंय. वागळेंच्या दणक्यामुळे गळपटलेला 'उशीर' वाहिन्यांच्या दारो'दार' भटकत होता. बायकोची मदत घेऊन 24 तासमध्येही घुसण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. आता त्या उशीर महाशयाला अँकरिंगची बक्षिसी देण्यात आली. तर प्रत्येक सत्ताधारी गटात फिट बसण्यात नुतन असणा-यांनाही असंच चमकावण्यात आलं. साम टीव्हीत असतानाही फणसावर निष्ठा अर्पण करणा-यालाही असंच प्रफुल्लित करण्यात आलं. 12 वर्ष मीडियात राहून स्क्रिप्ट न करता येणारे हे महाशय आता मुलाखती घेताहेत. जय महाराष्ट्रमध्ये फणसाबरोबर गेलेल्या एका तोडक-मोडक स्पोर्टस् प्रतिनिधीचीही घरवापसी झाली. याच फणसाचा आणखी एक बाबा भक्त इथं जॉईन झालाय. त्याचाही कहर सुरूच आहे. अँकर आणि रिपोर्टर मुलाखती घेत सुटलेत. प्रत्येकाला फक्त चमकायचं आहे. यात काम करणारे बुलेटिन प्रोड्युसर भरडले जात आहेत. पीसीआरचा प्रोडक्शन स्टाफ मदत करत नाही. ते खुशाल बसून असतात. मात्र सर्वच संपादक महाशयांना याच्याशी काही देणंघेणं नाही. चॅनेलकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे. परिणामी चॅनेलला टीआरपी मिळत नाही. आणि भाषा मात्र जग जिंकण्याची आहे. अशाने जग जिंकता येणं अशक्य आहे.