आयबीएन आणि लोकमतमध्ये लवकरच घटस्फोट

गेल्या सहा वर्षापासून एकत्रित संसार करणा-या आयबीएन आणि लोकमतमध्ये लवकरच घटस्फोट होणार आहे.सध्या सुरू असलेले चॅनल आयबीएनकडे जाणार आहे तर लोकमतवाले स्वतंत्र चॅनल सुरू करणार आहेत.लोकमतवाल्यांनीच वागळे यांना एडिटर इन चिफ पदाची ऑफर दिली आहे.मात्र वागळेंनी आपल्या काही अटी सांगितल्या असून,या अटी दर्डा शेठ मान्य करणार असल्याची माहिती बेरक्याची हाती लागली आहे.

आयबीएन आणि लोकमतमध्ये पाच वर्षाचा करार होता.तो गतवर्षीत संपला आहे.मात्र एक वर्षाचा करार वाढवून घेण्यात आला होता.आता आयबीएनची मालकी मुकेश अंबानी यांच्याकडे गेली आहे.अंबानी आणि दर्डामध्ये अजिबात जमत नाही.त्यामुळे हा करार आता कायमचा संपणार आहे.त्यामुळे दोघांत लवकरच घटस्फोट होणार आहे.

सध्याचे मुळ चॅनल आयबीएनकडेच राहणार आहे.त्याचे नाव आयबीएन ७ मराठी असे राहण्याची शक्यता आहे.तर लोकमतवाले आपल्या चॅनलचे नाव काय देणार,हे लवकरच स्पष्ट होणार आहे.लोकमतवाल्यांनी आपल्या टीमची जुळवाजुळव सुरू केली असून,त्यासाठी चंद्रकांत आणि संदीप हे आयबीएन - लोकमतचे जुने सवंगडी कामास लागल्याचे समजते.

मध्यंतरी बेरक्यास जे ई - मेल आले होते,ते याच चॅनल संदर्भात आले होते,अशी माहिती प्राप्त झाली आहे.दर्डा शेंठ मराठीबरोबर हिंदीही चॅनल सुरू करणार असून,त्यासाठी बैठका सुरू आहेत. जानेवारी २०१६ पर्यंत दर्डाचे चॅनल सुरू होईल,अशी प्राथमिक माहिती आहे.


  जाता जाता -
व्हीआयपी एक हिंदीत न्यूज चॅनल आहे.हे चॅनल मराठी न्यूज चॅनल सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. या चॅनलसाठीही वागळे यांचे नाव आघाडीवर आहे.आता वागळे हे व्हीआयपी जॉईन करणार की लोकमत,याकडं मीडियाचं लक्ष वेधलं आहे.