मुंबई आवृत्तीप्रमाणे आधी प्रकाशन व नंतर प्रमोशन या फंदात न पडता मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्राचे पुणे आवृत्तीचे लॉन्चिग आधी प्रमोशन व नंतर प्रकाशन असे करण्याचे व्यवस्थापनाने ठरविले आहे. त्यामुळे पुणे आवृत्तीचे लॉन्चिग रखडले आहे. पुणे शहरात जोरदार जाहिरातबाजी, वितरणाची व्यवस्था व लाईनपेक्षा स्टॉल विक्रीवर जोर अशी पॉलिसी तूर्ततरी व्यवस्थापनाने आखली आहे. सद्या पुणे शहरात वितरणासंदर्भात सर्व्हेक्षण सुरु झाले असून, त्यासाठी वितरण विभागात काहींना रूजू करून घेण्यात आले आहे. यापूर्वी संपादकीय विभागाच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती पार पडल्या होत्या. आता अंतिम टप्प्यातील मुलाखतीचे शेड्युल तयार केले जात आहे. साधारणतः पुढील दोन महिन्याचा कालावधी पुणे आवृत्तीच्या लॉन्चिगसाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रामदास ढमालेंचा लांडगा आला रे....!
पुण्यनगरीच्या अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक रामदास ढमाले हे नगरी वार्ता हे स्वतःचे दैनिक सुरु करीत असल्याचे त्यांनी स्वतःच जाहीर केले होते. परंतु, नेहमीप्रमाणे त्यांचा हा बारही फुसकाच ठरला आहे. त्यांचे दैनिक अद्याप तरी सुरु झाले नसून, ढमाले यांना अशाप्रकारेस्वतःच्या दैनिकाची वाच्यता करण्याची खोड गत काही वर्षांपासून असल्याची चर्चा नगरमध्ये रंगत आहे.
ढमालेनं पेपर काढला तर तोंड गोड करील : बाबा
रामदास ढमालेनं पेपर काढला तर मी तुमचे तोंड गोड करील, असे उद्गार पुण्यनगरीचे संस्थापक संपादक बाबा शिंगोटे यांनी काढले आहेत. नगरच्या काही पत्रकारांनी याबाबत त्यांना अवगत केलेअसता, उपरोक्त उद्गार त्यांनी काढले. पुण्यनगरीत सद्या बाबा शिंगोटे व ढमाले यांचे बिनसलेले असून, त्यामुळेच ढमाले पुण्यनगरीतून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. पुण्यनगरीतील ढमाले यांचे अधिकारही बर्यापैकी कमी करण्यात आले आहेत.