सावधान....न्यूज चॅनलच्या नावाखाली करोडो रूपयाचा गंडा घालणारी जोडगोळी सक्रिय

महाराष्ट्राच्या मीडीयामध्येही आता गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे.न्यूज चॅनल काढून देतो,असे सांगून बड्या उद्योगपतीला गाठायचे,त्याच्याकडून करोडो रूपये काढायचे आणि दुय्यम आणि निकृष्ट पध्दतीची मशिनरी आणायची आणि ही बाब लक्षात येण्याअगोदरच तेथून पोबारा करायचा आणि नविन उद्योगपती गाठून नविन चॅनल काढण्याचा गोरखधंदा पुण्यातील दोघांनी सुरू केला आहे.आतापर्यंत या जोडगोळीने दोघा उद्योगपतींना फसवले असून आता तिस-या उद्योगपतीला गळाला लावले आहे.
एकाचे नाव राहूल तर दुस-याचे नाव सम्राट असलेल्या या जोडीने पहिल्यांदा महाराष्ट्र माझा नावाचे चॅनल काढले.या चॅनलच्या मालकाकडून करोडो रूपये उकळले आणि त्यास गंडा घातला.त्यानंतर या जोडगोळीने सांगलीच्या जागृती अ‍ॅग्रो फुड्सच्या राज गायकवाड याना फसवले आहे.त्यांना नव जागृती चॅनल काढण्यास भाग पाडले.करोडो रूपये उकळले आणि दुय्यम आणि निकृष्ट पध्दतीची मशिनरी खरेदी करून त्यात करोडो रूपयाचा गैरव्यवहार केला.सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, BMW कारचे पैसे घ्यायचे आणि नॅनो कार द्यायची असा त्यांचा उंद्योग आहे.दुय्यम आणि निकृष्ट पध्दतीच्या मशिनरीमुळं जागृती चॅनलमध्ये वारंवार अडथळे येत आहेत.त्यामुळं या चॅनलमध्ये काम करणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.राज गायकवाड यांना फसवणारेच आता राज गायकवाड यांना अडचणीत आणण्यासाठी विविध षडयंत्र रचत आहेत.त्यामुळे गायकवाड मोठ्या अडचणीत सापडले असून,कर्मचा-यांच्या आणि स्ट्रींजरच्या दोन महिन्यापासून पगारी थकलेल्या आहेत.
महाराष्ट्र माझा,जागृती चॅनलला गंडा घालून पुण्यातील ही भामटेगिरी करणारी जोडगोळी आता नविन चॅनल काढत आहे.त्यासाठी पत्रकारांना ऑफर दिल्या जात आहेत.दर सहा महिन्या
ला चॅनल बदलून गंडा घालणा-या या जोडगोळीपासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.