मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक येत्या २७ जून रोजी होत असून,ही निवडणूक यंदा गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.अध्यक्षपदासाठी चौघेजण रिंगणात उतरले असून,चुरशीचा सामना विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले आणि शशिकांत सांडभोर या गुरू -शिष्यात होत आहे.
अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले,माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी,माजी अध्यक्ष नरेंद्र वाबले आणि शशिकांत सांडभोर असे चौघेजण रिंगणात उतरले आहेत. मोकाशी आणि वाबळे यांना पॅनलसाठी माणसेही मिळाली नाहीत,त्यामुळे एकटा चलो रे याप्रमाणे ते अध्यक्षपदासाठी उभे आहेत.
मात्र मटाले आणि सांडभोर यांचे पुर्ण पॅनल उभे आहे.
मटाले यांनी यापुर्वी दोनदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून,हॅटट्रीक मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.मात्र सांडभोर यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केलेले आहे.
मुुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवू केलेली ५० लाख रूपये मदत नाकारून एक कोटीचा आग्रह धरणे त्यामुळे पत्रकार संघाचे नुकसान होणे आणि पत्रकार संघात ४५ हजार रूपयाचा नोकर ठेवणे हे मटाले यांचे निर्णय टिकेचा विषय बनले आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण ५६३ मतदार पात्र असून,ते कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार,याकडं लक्ष वेधले आहे.