उर्दू पेपरचा पत्रकार आहे मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष!

जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नावात तर मराठी पत्रकार संघ आहे, प्रत्यक्षात या संघाचा अध्यक्ष आहे एका उर्दू दैनिकाचा प्रतिनिधी. तोही खरंच पत्रकार आहे की नाही, हे त्यालाच माहीत. गंमत म्हणजे हा इसम काँग्रेसचा शहराध्यक्ष देखील आहे.
एरव्ही पत्रकारांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, असे म्हटले जाते. पण इथं तर एका पक्षाचा शहराध्यक्षच पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे. अर्थात पत्रकारितेशी त्याला काहीही देणेघेणे नाही. पत्रकार संघाच्या नावाने दुकानदारी करणे, सत्ताधारी नेते व सरकारी यंत्रणेला हाताशी धरून फायदे लाटणे आणि मिरवून घेणे एवढेच त्याचे उद्दिष्ट आहे. अर्थात जालना शहर व जिल्ह्यातील पत्रकारांनी त्याला डोक्यावर घेतल्यामुळेच त्याचे फावले. एकीकडे वेगवेगळ्या शहरातील व जिल्ह्यांच्या पत्रकार संघटनांचे पदाधिकारी हे श्रमिक पत्रकार असताना जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष हा मराठी सोडाच, उर्दू पेपरचाही पत्रकार आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, अशाच पत्रकारांनी त्याला या पदावर बसवलेले आहे.