बेरक्याच्या दणक्यानंतर 'नव जागृती'चे प्रशासन वठणीवर

पुणे - 'बेरक्या'च्या दणक्यानंतर 'नव जागृती'चे प्रशासन हादरले आहे.'बेरक्या'च्या वृत्ताची दखल घेवून मालक राज गायकवाड यांनी राज्यातील स्ट्रींजरचे माहे मार्च महिन्याचे मानधन बँक खात्यावर जमा केले आहे.उर्वरित एप्रिल, मे आणि चालू जून महिन्याचे मानधन १० जुलैपर्यंत देण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले आहे.त्याचबरोबर कर्मचा-यांचे पेमेंट येत्या दोन दिवसांत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.त्यापैकी काही अनामत रक्कम त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे.
केवळ पेमेंटअभावी 'नव'जागृती'च्या कर्मचा-यांत आणि स्ट्रींजर रिपोर्टरमध्ये निरूत्साह आलेला आहे.गेल्या काही दिवसांपासून एक किंवा दोन बुलेटीन सुरू आहेत,आणि तेच रिपीट केले जात आहेत.त्यामुळे स्पर्धेत येत असलेल्या या चॅनलला अवकळा आली आहे.तीन महिन्यापुर्वी 'नव जागृती' चॅनलमध्ये एक 'सल्लागार संपादक' नेमण्यात आला होता.त्यांनी मालक गायकवाड यांना चुकीचा सल्ला दिल्यामुळे चालू असलेल्या चॅनलला 'वाळवी' लागली आणि सारी 'समीकरणे'च बदलली.या 'वाळवी'मुळेच सुरळीत चालू असलेल्या चॅनलला ब्रेक बसला.
'नव जागृती'च्या दोन संचालकांनी चुना लावल्यामुळे आणि मीडियातील अतिहुशार लोकांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळं चॅनलमध्ये गडबड झाल्याचे मालक राज गायकवाड यांनी मान्य केले आहे.मात्र १० जुलैपर्यंत सर्व गाडा सुरळीत करू,असा खुलासाही त्यांनी केला आहे.
चंद्रपूरमध्ये काही लोकांनी आपल्यास ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला,त्यातून चुकीचे वृत्त प्रसिध्द झाले होते,मात्र नंतर त्याचा खुलासा प्रसिध्द झालेला आहे.आपणाविरूध्द चंद्रपूर अथवा कोठेही गुन्हा दाखल नसून,जागृती अ‍ॅग्रो फुडस् कंपनीचा कारभार नियमानुसार सुरू असल्याचेही गायकवाड यांचे म्हणणे आहे...

जाता-जाता 
बेरक्या कोणत्याही न्यूज चॅनल अथवा वृत्तपत्राच्या मालकांच्या विरोधात नाही.'नव जागृती' कर्मचा-यांचा आणि स्ट्रींजर रिपोर्टरचे पेमेंट वेळेवर व्हावे आणि हे चॅनल स्पर्धेत यावे,ही अपेक्षा आहे.
'नव जागृती'ला बेरक्याच्या नव्याने शुभेच्छा...