औरंगाबाद 'दिव्य मराठी'ची मंडळी अडचणीत!!

सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलून कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने मजिठिया वेतन आयोगाचे लाभ नको असल्याचे घोषणापत्र लिहून घेतल्याबाबत औरंगाबाद 'दिव्य मराठी'चे संपादक निवासी दीपक पटवे, स्टेट एचआर हेड निशिकांत तायडे आणि डेप्युटी एचआर मैनेजर अजित पत्की अडचणीत आले आहेत. 'दिव्य मराठी'चे ई-पेपर एक्झिक्युटीव्ह हेमकांत चौधरी यांचा छळही या तिघांच्या अंगाशी आला आहे. 
संपूर्ण महाराष्ट्रात दैनिक भास्कर/दिव्य मराठी, डीबी कॉर्प समूहात मजिठिया वेतन आयोगाचे लाभ नको असल्याचे घोषणापत्र लिहून न देणारे हेमकांत चौधरी हे एकमेव जिगरबाज कर्मचारी आहेत. इतर सर्वांनी निमूटपणे शेपूट घातले!! मात्र,चौधरी यांनी व्यवस्थापनाचा कोणताही दबाव जुमानला नाही. त्यामुळे वरील तिघांनी कटकारस्थान रचून चौधरी यांची रांची (झारखंड) येथे बदली केली होती. त्याला औरंगाबाद औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयात खोटे घोषणापत्र लिहून देणारा एचआर विभाग आणि डेप्युटी एचआर मैनेजर अजित पत्की यांच्याविरोधात ते न्यायालयीन दिशाभूलीचा स्वतंत्र खटला दाखल करीत आहेत. शिवाय कर्मचारी छळप्रकरणी दीपक पटवेविरोधात औरंगाबाद पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय,मंत्रालयात कामगार विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून औरंगाबादचे सहाय्यक कामगार आयुक्त इटकरी यांची चौकशी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या "आपले सरकार'वर दाखल तक्रारीनुसार 'दिव्य मराठी'तील कर्मचारी छळाच्या प्रकारांची चौकशी करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले आहेत!!